Jitendra Awhad News : आक्रमक सेना जेव्हा युद्धाला निघते तेव्हा तुतारी वाजवली जाते, 83 वर्षीय योद्ध्याने युद्ध पुकारलं असल्याची पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून काल रात्री शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आलं आहे. हे चिन्ह मिळाल्यानंतर आता उद्या रायगडावरुन चिन्हाचं लॉन्चिंग केली जाणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘Article 370’ आणि ‘क्रॅक: जीतेगा तो जीगा’मध्ये टक्कर, कोण ठरेल अव्वल?
जितेंद्र आव्हाड म्हणाले, आक्रमक सेना जेव्हा युद्धानिघते तेव्हा तुतारी वाजवली जाते जेव्हा ते परत येतात तेव्हाही वाजवली जाते . निवडणुकीच्या रिंगणात उतरताना 84 वर्षांच्या योध्याने आता युद्ध पुकारलं आहे. ही विचारांची लढाई आम्ही जिंकणारच आहोत. शिवरायांना नमन करुन तुतारी वाजवत दिल्लीच्या तख्ताला भीती वाजेल असा तो आवाज होता. महाडमध्येही जाऊन आम्ही बाबासाहेबांचे आशिर्वाद घेऊन निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.
Manohar Joshi : बाळासाहेबांचा एक आदेश अन् मनोहर जोशींनी क्षणात मुख्यमंत्रिपद सोडलं
तसेच हे नवीन चिन्ह मिळाल्यानंतर त्याची सुरुवात रायगडावरुन करावी, अशी सर्वच कार्यकर्त्यांसह शरद पवार यांची इच्छा होती. त्यामुळे तो कार्यक्रम रायगडावर होत आहे. उद्याच्या कार्यक्रमाला शरद पवार स्वत: उपस्थित राहणार आहेत. लोकांच्या घराघरात चिन्ह पोहोचले आहे. सध्या आगामी लोकसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडीतील चर्चा अंतिम टप्प्यावर आली आहे. जागांबाबत बोलणं उचित नाही, अंतिम टप्प्यावर चर्चा सुरु असून मी लहान कार्यकर्ता असल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी जागावाटपावर बोलणं टाळलं आहे.
पक्ष काढलं निशाणी काढली…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याने उभा केला आहे, तुम्ही त्यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं आहे. याबाबतचा राग लोकांच्या मनात आहे. यावर जेव्हा न्यायालयात सुनावणी सुरु होती, तेव्हा पाकिस्तानात जे झालं तेच तुम्हाला महाराष्ट्रात करायंचंय का? या शब्दांत न्यायालयाने अजित पवार गटाला फटकारलं असल्याचंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.