Download App

खासदार नवनीत राणांच्या जन्मतारखेवरुन नवा वाद

अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana)कोणत्या न कोणत्या कारणानं कायम चर्चेत असतात. त्यातच आता नवनीत राणांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. खासदार राणांच्या दोन जन्मतारखा (Two birth dates)असल्याचं समोर आलं आहे. हाच मुद्दा ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांनी उचलून धरला आहे. नवनीत राणा यांच्या दोन जन्मतारखा असून त्यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या (Fake caste certificates)आधारे निवडणूक लढवल्या आहेत, असा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group) जिल्हाप्रमुख सुनील खराटे (Sunil Kharate)यांनी केला आहे. खासदार नवनीत राणा यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 6 एप्रिल1985 अशी जन्मतारीख असून त्यावर जातीचा उल्लेख शीख असा आहे.

राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ होणार; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बदलणार; जयंत पाटील यांची माहिती

शिवसेना ठाकरे गटाने आता खासदार नवनीत राणांच्या जन्मतारखेवर प्रश्न उपस्थित केला आहे. खराटे यांनी आज पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्तानं अमरावतीत ‘हिंदू शेरणी’ असे मोठे बॅनर लागले आहे. या बॅनरवर 6 तारखेला हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti)दिवशी हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामूहिक हनुमान चालिसाचे वाचन करणार असल्याचा उल्लेख आहे.

6 एप्रिलला खासदार नवनीत राणांचा वाढदिवस आणि त्यांची जात ही शीख आहे. तसा उल्लेख त्यांच्या जन्मदाखल्यावर असल्याचे खराटेंनी सांगितले. तर ज्या जन्माच्या दाखल्यावर त्यांनी लोकसभा लढवली ती मोची जातीच्या आरक्षणावर आणि त्यांची जन्मतारीख 15 एप्रिल 1985 आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणांचा जन्मदाखला खरा कोणता आहे? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

हनुमान जयंती आणि आपला वाढदिवस एकाच दिवशी आला असल्याचं खासदार नवनीत राणा सर्वांना आनंदाने सांगत आहेत. तर दुसरीकडं त्यांनी आपल्या जातीच्या दाखल्यासाठी जोडलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जन्मतारीख 15 एप्रिल 1985 अशी आहे. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर मोची या जातीचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांची खरी जन्मतारीख आहे तरी कोणती? असा सवाल ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

Tags

follow us