मलाही खालची भाषा येते पण… उद्धव ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांनी सुनावलं

मलाही खालची भाषा येते पण… उद्धव ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांनी सुनावलं

नागपूर : खालची भाषा मलाही येते पण मी नागपूरचा आहे. मी तसं बोलणार नाही कारण माझे संस्कार ते नाहीत, याचे उत्तर जनता देईलच, असा पलटवार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे. दरम्यान, ठाण्याच्या घटनेप्रकरणी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीकेची तोफ डागली होती. त्यावर आता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना चांगलंच धुतलंय.

मुंबई महापालिकेत आहारतज्ज्ञ पदांच्या 35 जागांची भरती; ‘इतका’ मिळणार दिवसाचा पगार

फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावून निवडून आले अन् खूर्चीसाठी विरोधकांची लाळ घोटत आहेत. तर मग खेर फडतूस कोण? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय. तसेच फडतूसचे उत्तर थयथयाट करणाऱ्यांनी आधी दिलं पाहिजे, महाराष्ट्राच्या जनतेला याचं उत्तर माहित आहे, ते बोलले त्यापेक्षा खालची भाषा मला वापरता येत पण मी नागपूरचा आहे. तसं बोलणार नाही. कारण माझे संस्कार नसल्याचं ते म्हणाले आहेत.

“ऐका….सुविचार अंधारे ताईचे” व्हिडीओ पोस्ट करत शिरसाट यांनी अंधारेंना पुन्हा डिवचलं

तसेच दोन मंत्री जेलमध्ये गेल्यावर त्यांचा राजीनामा मागण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवत नाहीत आणि त्यांचा लाळघोटेपणा जे करीत असतात, त्यांना बोलण्याचा अधिकार तरी काय? जे वाझेच्या मागे लाळ घोटतात, ज्यांच्या काळात पोलीस खंडणी गोळा करतात, अशा लोकांना बोलण्याचा अधिकार तरी काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तरच गृहमंत्र्यामध्ये दम असल्याचं समजू; जयंत पाटलांचं फडणीसांना खुलं आव्हान

अडीच वर्ष घरात बसून राजकारण करणार्‍यांनी जास्त बोलू नये. आम्ही संयमाने वागतो याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असे नाही. ज्या दिवशी बोलणे सुरू करु, त्यादिवशी पळता भूई थोडी होईल, असा सज्जड दमही त्यांनी उद्धव ठाकरेंना भरला आहे.

ठाण्यात आज ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना चांगलंच धारेवर धरलं. त्यानंतर राज्यभरातून भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं जात होतं.

अखेर या संपूर्ण प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंना चांगलंच सुनावलं आहे. त्यांच्या या प्रत्युत्तरानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube