मुंबई महापालिकेत आहारतज्ज्ञ पदांच्या 35 जागांची भरती; ‘इतका’ मिळणार दिवसाचा पगार

मुंबई महापालिकेत आहारतज्ज्ञ पदांच्या 35 जागांची भरती; ‘इतका’ मिळणार दिवसाचा पगार

सरकारी नोकरी प्रत्येकालाच पाहिजे असते. मात्र, आजच्या स्पर्ध्येच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं मोठं अवघड झालं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचं प्रत्येकाचचं स्वप्न साकार होतं असं नाही. त्यामुळं पात्रता असूनही अनेकजण हे खासगी नोकरी करतांना दिसतात. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्याासाठी खुशखबर आहे. नुकतीच बृहन्मुंबई महानगरपालिकेने आहारतज्ज्ञ पदांच्या 35 जागांसाठी भरती प्रक्रियेचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.portal.mcgm.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

4 एप्रिल 2023 पर्यंत इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी अर्ज आणि आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून एकत्रितरित्या एका झीप फाईलमध्ये जतन करून पीडीएफ फाईल स्वरूपात पाठवावा. महत्वाची बाब अशी 4 एप्रिल नंतर 6 वाजेनंतर अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाजणे गरजेच आहे. कारण, अर्ज करतांना अर्जात कोणत्याही प्रकारची त्रुटी असल्यास अर्ज स्वीकारल्या जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पदाचे नाव – आहारतज्ज्ञ

एकूण जागा – 35

शैक्षणिक पात्रता
उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठीतून Bsc (आहारतज्ञ विभाग) पदवीधर असावा.
उमेदवाराने UGC मान्यतप्राप्त विद्यापीठातील Nutrition and Dietetics शाखेतील पदव्युत्तर Diploma/M.sc/ Masters असावा.
शासकीय संस्थेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
संगणक विषयक ज्ञान MS-CIT किंवा राज्य सरकारने ठरवेला संगणक विषयक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र आवश्यक

वयोमर्यादा
उमेदवाराचे दिनांक 31 मार्च 2023 रोजी वय 40 वर्षापेक्षा अधिक असू नये. सेवानिवृ्त्त कर्मचाऱ्यांना वयाची अट 62 वर्षापर्यंत असेल.

Kashmir : आतंकवादी संघटनेच्या निशाण्यावर RSS चे 30 नेते, तपास सुरु

पगार
1200 रुपये प्रतिदिवस

आवश्यक कागत्रपत्रे
अर्जाचा नमुना
बायोडाटा
SSC गुणपत्रक व प्रमाणपत्र
HSC गुणपत्रक व प्रमाणपत्र
पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र
एमएससीआयटी प्रमाणपत्र
अनुभव प्रमाणपत्र

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्जाची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्जाची अंतिम तारीख – 4 एप्रिल 2023

जाहिरात :
https://drive.google.com/file/d/1skOA1bbLpr499tQaC-EEEhIcJL7SCNDJ/view

● अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल : NCDCELL2022@gmail.com

● अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या : https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube