Download App

News Area India Survey : बीड जिल्ह्यात भाजप-राष्ट्रवादी 50-50, कोणाच्या जागा धोक्यात?

News Area India Survey Maharashtra : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. अशात ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Area India) या संस्थेने महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे किती पक्षीय बालाबल असेल याचा अंदाज सर्व्हेतून सांगितला आहे. यामध्ये भाजपला सर्वाधिक 125 जागा दाखवल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला 55-56, काँग्रेसला 50-53 जागा मिळतील असा अंदाज आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर दोन गटात विभागलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाला मोठा फटका बसल्याचे दाखवले आहे. शिंदे गटाला 25 जागा, तर ठाकरे गटाला 17 ते 19 जागा मिळतील, तर इतरांना बारा जागा मिळतील, असा अंदाज न्यूज एरिना इंडिया संस्थेने आपल्या सर्व्हेत वर्तवला आहे.

या सर्व्हेत जिल्हानिहाय अंदाज देखील वर्तविण्यात आले आहेत. बीडमध्ये भाजपला 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 3 मिळणार असल्याचे सांगितले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे चार आमदार निवडून आले होते तर भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या. सर्वाधिक धक्कादायक निकाल बीड आणि परळी मतदारसंघात लागला होता. परळीत भावाकडून बहीण पराभूत झाली होती तर बीडमध्ये पुतण्याने चुलत्याला आसमान दाखवले होते.

मतदारसंघनिहाय सर्व्हे अंदाज

आष्टी विधानसभा मतदारसंघ
आष्टी, पाटोदा, शिरुर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांची जागा धोक्यात असल्याचे सर्व्हेतून दाखवले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बाळासाहेब आजबे यांनी भाजपचे आमदार भिमराव धोंडे यांचा 25 हजारपेक्षा जास्त मताधिक्याने पराभव केला होता. त्यावेळी भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांची भूमिका निर्णायक राहिली होती. सुरेश धस यांनी आपल्याला प्रमाणिकपणे मदत केली नाही आरोप त्यावेळी धोंडे यांनी केला होता.

धस आणि धोंडे दोघेही भाजपमध्ये असले तरी देखील त्यांच्यात सख्य नसल्याचे बोलले जाते. दोघेही मतदारसंघात स्वतंत्र्य कार्यक्रम घेत असतात. मधल्या काळात पंकजा मुंडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यामध्ये पाहिजे तेवढं यश आले नव्हते. त्यामुळे 2024 ला भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळते यावर आमदार बाळासाहेब आजबे यांच्या विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. सुरेश धस स्वत:साठी किंवा आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी इच्छूक आहे तर भिमराव धोंडे यांनी आत्ताच उमेदवारीसाठी दिल्ली आणि मुंबईत फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे पुन्हा दोघांच्या भांडणात आजबेंची लॉट्री लागतीय का? हे पाहावे लागणार आहे.

News Arena India Survey : रोहित पवारांना धोबीपछाड देणे राम शिंदेंना अवघडच

गेवराई विधानसभा मतदारसंघ
भाजपचे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांची जागा न्यूज एरिना इंडियाच्या सर्व्हेतून धोक्यात असल्याचे सांगितले आहे. मागील चाळीस वर्षापासून गेवराई विधानसभा मतदारसंघावर पंडित घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. मागील चाळीस वर्षात पवार यांच्या घराण्याचा अपवाद वगळता सर्वाधिक काळ पंडित घराण्याची सत्ता राहिली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत चुलते पुतणे एकत्र आले तरीही लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादीच्या बदामराव पंडित यांचा पराभव केला होता. बदामराव पंडित आणि अमरसिंह पंडित हे चुलते पुतणे कडवे विरोधक म्हणून ओळखले जातात. पंडित घरातील वादाचा फायदा घेत लक्ष्मण पवार यांनी सलग दोनदा गेवराईमधून विजयी झाले आहेत.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेते बदामराव पंडित यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती तर राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित यांचे छोटे बंधू विजयसिंह पंडित यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या तिरंगी लढतीमध्ये लक्ष्मण पवार यांनी बाजी मारली होती. शिवसेनेतील बंडखोरीनंतर बदामराव पंडित यांनी कोणत्या गटात आहे हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित किंवा विजयसिंह पंडित यांना उमेदवारी निश्चित आहेत तर भाजपकडून लक्ष्मण पवार उमेदवारी असतील, आता पुन्हा बदामराव पंडित काय भूमिका घेतात यावर गेवराईचा आमदार ठरणार आहे.

News Arena India Survey : पाटील विरुद्ध महाडिक टफ फाईट होणार? कोल्हापूर दक्षिणमध्ये 50:50 चा अंदाज

बीड विधानसभा मतदारसंघ
बीड विधानसभा मतदार संघात न्यूज एरिना इंडियाच्या सर्व्हेनुसार राष्ट्रवादीचे आमदार संदिप क्षीरसागर पुन्हा एकदा बाजी मारणार असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांना मोठा धक्का मानला जात आहे. 2019 च्या विधानसभा मतदार संघात चुलत्या पुतण्यामध्ये लढत झाली होती. त्यामध्ये संदिप क्षीरसागर यांनी चुलत्या धोबीपछाड दिला होता. त्यावेळी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांची महत्वाची भूमिका राहिली होती. आता जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत असले तरी अद्याप कोणत्या गटात जाणार हे नक्की नाही. मधल्या काळात ते भाजपच्या देखील जवळ गेले होते. परंतु भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी उमेदवारीसाठी थेट देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातल्याचे बोलले जाते. त्यामुळे बीड मध्ये पुन्हा एकदा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

केज विधानसभा मतदारसंघ
केज विधानसभा मतदारसंघात आमदार नमिता मुंदडा यांची जागा सुरक्षित असल्याचे सर्व्हेमधून आले आहे. दिवंगत लोकनेत्या विमलताई मुंदडा यांच्या त्या सुनबाई आहेत. 2019 मध्ये भाजपमधून निवडून आलेल्या महिला आमदारामध्ये त्यांच्या कामाचा चांगला रिपोर्ट असल्याचे बोलले जाते. 2019 मध्ये त्यांची लढत राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे यांच्याशी झाली होती. विमल मुंदडा सलग पाच वेळा विजयी झाल्या होत्या. त्या दोन वेळा भाजप तर तीन वेळा राष्ट्रवादीकडून विजयी झाल्या होत्या. 2019 ला नमिता मुंदडा यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये जाऊन उमेदवार झाल्या होत्या. 2024 ला राष्ट्रवादीला त्यांच्यासमोर तगडा उमेदवार शोधावा लागणार आहे.

विखेंना धक्का! गणेश कारखाना थोरात-कोल्हेंनी हिसकावला…

माजलगाव विधानसभा मतदारसंघ
न्यूज एरिना इंडियाच्या सर्व्हेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला माजलगावमध्ये मोठा धक्का बसल असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके यांची जागा धोक्यात असल्याचे दाखवले आहे. माजलगाव मतदारसंघातून आतापर्यंत प्रकाश सोळंके हे सर्वाधिक वेळा आमदार झाले आहेत. मात्र 2014 मध्ये आर. टी. देशमुख यांच्याकडून त्यांचा पराभव होता. 2019 साली सोळंके यांनी रमेश आडसकर यांचा पराभव करत चौथ्यांदा विधानसभा गाठली होती. महाविकास आघाडी काळात मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने सोळंके नाराज होते. त्यानंतर बीड जिल्हा परिषदेमध्ये त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांना उपाध्यक्षपद देण्यात आले होते. पंकजा मुंडे यांच्या जवळचे मानले जाणारे रमेश आडसकर हे पुन्हा एकदा 2024 ला सोळंकेंना तगडे आव्हान देऊ शकतात.

परळी विधानसभा मतदारसंघ
भाजपच्या दिग्गज नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघातून पराभव पत्करावा लागणार असे दिसते आहे. परळीच्या जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणार असल्याचे या सर्व्हेमध्ये दाखविण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांनी 2009 साली प्रथम विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांचा विजय झाला होता. यानंतर 2014 साली देखील त्यांनी भरघोस मतांनी विजय मिळवत विधानसभा गाठली होती. त्यानंतर पंकजा मुंडेंची थेट कॅबिनेटपदी वर्णी लागली होती. पण 2019 साली पंकजा मुंडेंचे कट्टर प्रतिस्पर्धी व त्यांचेच चुलत भाऊ धनंजय मुंडेंनी त्यांचा पराभव केला होता. यावेळेस पुन्हा परळीच्या जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येताना दिसत आहे.

Tags

follow us