News Arena India Survey : पाटील विरुद्ध महाडिक टफ फाईट होणार? कोल्हापूर दक्षिणमध्ये 50:50 चा अंदाज
कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress) नेते सतेज पाटील यांना संपूर्ण जिल्ह्यासह पुतण्या आणि विद्यमान आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांच्यासाठी अधिकचे कष्ट घ्यावे लागणार असल्याचे चित्र आहे. 2024 मध्ये कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपमध्ये कडवी लढत होणार असून विजासाठी 50:50 टक्के समीकरण असेल असा अंदाज न्यूज एरिना इंडिया या संस्थेने वर्तविला आहे. त्यामुळे ऋतुराज पाटील यांना भाजपचे संभाव्य उमेदवार अमल महाडिक विजयासाठी संघर्ष करायला लावणार, अशी शक्यता आहे. (News Arena India Survey kolhapur south Maharashtra assembly election 2024)
2009 मध्ये कोल्हापूर दक्षिणमधून सतेज पाटील यांनी अपक्ष असलेल्या धनंजय महाडिक यांचा पराभव केला. तर 2014 मध्ये धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पराभव केला. 2019 मध्ये पुन्हा सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा 42,709 मतांनी पराभव केला. महाडिक गटाला हा मोठा धक्का मानला गेला. त्यानंतर आता धनंजय महाडिक यांनी राज्यसभा निवडणुकीत विजय मिळविल्याने महाडिक गटामध्ये नवचैतन्य संचारले असून या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी महाडिक साधण्याचा अंदाज आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती काय सांगते?
कोल्हापूरमधील 10 पैकी भाजपला 2-3, शिवसेनेला 1, राष्ट्रवादीला 4 आणि काँग्रेसला 2 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
- चंदगड : राष्ट्रवादी
- राधानगरी : राष्ट्रवादी
- कागल : राष्ट्रवादी
- कोल्हापूर दक्षिण: 50:50
- करवीर : काँग्रेस
- कोल्हापूर उत्तर : शिवसेना
- शाहूवाडी : भाजप
- हातकणंगले (SC): काँग्रेस
- इचलकरंजी : भाजप
- शिरोळ : राष्ट्रवादी
Pune/ Desh Region (58 seats) –
BJP : 22-23
SS : 1
NCP : 23
INC : 9-10
SSUBT : 1
OTH : 1Kolhapur – BJP :2-3, SS : 1, NCP : 4, INC : 2-3
271. Chandgad : NCP
272. Radhanagari : NCP
273. Kagal : NCP
274. Kolhapur South : 50:50
275. Karvir : INC
276. Kolhapur North : SS
277.…— News Arena India (@NewsArenaIndia) June 17, 2023
महाराष्ट्रातील काय स्थिती?
या सर्व्हेनुसार, पक्षनिहाय वर्तविण्यात आलेल्या अंदाजामध्ये येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये 123-129 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 25 जागा मिळणार असल्याचं म्हंटलं. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसला 55 – 56 जागा आणि काँग्रेसला 50-53 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 17-19 जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र आहे. तर इतर 12 जागांवर छोटे पक्ष आणि तेलंगणाच्या बीआरएस पक्षाही महाराष्ट्रात एन्ट्री मिळविणार असल्याचे भाकीत या सर्वेमध्ये सांगण्यात आले आहे.