Nilesh Lanke : नगर जिल्ह्यातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पारनेर मतदारसंघाचे विद्यमान आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) हे आज आपल्या आमदारकीचा राजीनामा देणारा असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. लंके सध्या अजित पवार गटात असून ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून ते नगर लोकसभा निवडणूक लढवणार हे आता निश्चित झाले आहे. नगर दक्षिणेत आता सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत होणार.
Israel Airstrike in Syria : इस्त्राईलचा सिरीयात हवाईहल्ला; 36 जवान मारले, भयावह व्हिडीओ समोर
गेल्या वर्षभरापासून लोकसभेची तयारी ही आमदार निलेश लंके यांच्याकडून सुरू होती. मात्र महायुतीत असल्याने नगर दक्षिणेची जागा ही भाजपकडे होती व भाजपकडून सुजय विखे यांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे लंके यांनी देखील लोकसभेच्या अनुषंगाने राजकीय हालचाली सुरू केल्या.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाची 7 दिवसांत इतकीच कमाई, बजेटचा आकडा आहे खूपच मोठा
गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीगाठी घेत आहे. नुकतेच नगर शहरात पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला देखील लंके यांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे लंके हे लोकसभा लढवणार हे मात्र निश्चित झाले होते. लंके व पवार भेटीगाठी सुरू असल्या तरी मात्र त्यांनी अधिकृतरित्या शरद पवार गटात प्रवेश केला नव्हता.
Rameshwaram Cafe Blast चा आरोपी मुजम्मिल शरीफ एनआयएकडून ताब्यात; तीन राज्यांत 18 ठिकाणी छापे
पक्षांतर बंदी कायद्याची बाधा येऊ शकते त्यामुळे लंके शांत होते. आज लंके हे आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणारे असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. तसेच आपल्या मतदारसंघातून म्हणजेच पारनेर येथून ते आज लोकसभेचे रणशिंग देखील फुंकणार असल्याचे समजते आहे. ते विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा देणार असल्याची माहिती मिळते आहे.
नगर दक्षिणेत विखे विरुद्ध लंके सामना
नगर दक्षिणेत महावितू कडून भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. इकडे महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नव्हती. मात्र लंके यांच्या शरद पवार गटाकडे सुरू असलेल्या हालचाली पाहता महाविकास आघाडी कडून निलेश लंके यांनाच लोकसभेसाठी वरी जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील बोलले जात होते. लंके यांनी आज राजीनामा दिला की नगर दक्षिणेमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना लोकसभेसाठी रंगणार हे मात्र आता निश्चित झाले आहे.