‘आजोबांनी क्रिकेटमध्ये चिअरलीडर्स आणल्या…’ निलेश राणेंचा रोहित पवारांवर हल्लाबोल

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली. एमसीए सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवारांचा क्लब गटाकडून विजय झाला. त्यानंतर त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी किरण सामंत यांची तर सचिवपदी शुभेंद्र भांडारकर यांची निवड झाली आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर रविवारी एमसीए कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाला. रोहित पवारांच्या निवडीनंतर सर्वच क्षेत्रातून […]

157

157

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली. एमसीए सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवारांचा क्लब गटाकडून विजय झाला. त्यानंतर त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

तसेच उपाध्यक्षपदी किरण सामंत यांची तर सचिवपदी शुभेंद्र भांडारकर यांची निवड झाली आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर रविवारी एमसीए कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाला.

रोहित पवारांच्या निवडीनंतर सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. माजी खासदार निलेश राणेंनीही त्यांचं अभिनंदन केले. अभिनंदन करताना मात्र त्यांनी पवार कुटुंबावर जोरदार टीका केलीय.

रोहित पवारांचं क्रिकेटमधील योगदान काय असा सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान निलेश राणे यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय. त्यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या हे महाशय काय आणतात बघू या. असा हल्लाबोल माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे.

Exit mobile version