Nitesh Rane : शिवसेना निकाल : नितेश राणे हसतच सुटले

मुंबई : उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला. यानिकलानंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे हसतच सुटले. राणे यांनी असाच एक हसत असतानाच व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच या निकालानंतर राणे हे प्रतिक्रिया देताना देखील हसत होते. यावेळी त्यांनी उद्धव […]

Untitled Design (45)

Untitled Design (45)

मुंबई : उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला. यानिकलानंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे हसतच सुटले. राणे यांनी असाच एक हसत असतानाच व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच या निकालानंतर राणे हे प्रतिक्रिया देताना देखील हसत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आता इलका पण आमचा आणि धमाका पण आमचाच असे म्हणतच आमदार राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना व भाजपकडून आनंद साजरा करण्यात आला. तसेच या निर्णयावर शिंदे गटाचे नेतेमंडळी तसेच भाजपच्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या. निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला धक्का बसताच भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

राणे म्हणाले, कणकवलीत बॅनर लागले होते, इलाका तुमचा धमाका आमचा मात्र आता इलका पण आमचा आणि धमाका पण आमचाच. आता राणेंच्या कणकवलीत पुन्हा येऊ नका, अन्यथा जे काही राहील आहे ते पण जाईल अशा शब्दात राणे यांनी थेट ठाकरेंवर टीका केली.

Nitesh Rane : इलका पण आमचा आणि धमाका पण आमचाच; नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचले

आता बाळासाहेबांच्या विचाराचे जे खरे वारसदार आहेत ते म्हणजे एकनाथ शिंदे व त्यांचे सर्व सहकारी हेच या निकालातून स्पष्ट होत आहे. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंना देखील समाधान वाटत असले. तसेच उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार धुळीस मिळवले, याचीच चपराक ठाकरेंना बसली आहे, अशा शब्दात नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडव्या शब्दात हल्लाबोल केला आहे.

आता आदित्य ठाकरेंनी देखील शिंदेकडे यावे
शिवसेना एकनाथ शिंदेंची असून आता ठाकरेंकडे राहिलेले उरलेले आमदार देखील आता एकनाथ शिंदे यांच्याकडे येतील. एक व्हीप जारी झाला तर ठाकरेंकडे राहिलेले सगळे आमदार अपात्र होतील. आदित्य ठाकरे देखील यामध्ये अपात्र होतील म्हणून आदित्य यांनी देखील आता एकनाथ शिनेकडे येऊन शिवसेनेत सामील व्हावे. आता उद्धव ठाकरेंकडे काही एक राहिलेले नाही. याला कारणीभूत आदित्य ठाकरे आहे, अशी टीका राणे यांनी केली आहे.

Exit mobile version