ठाणे : शिवसेना (Shiv Sena) नेते अनिल परब (Anil Parab) यांनी किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) आव्हान दिले की, नारायण राणेंचे घर तोडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तिथं माझ्याबरोबर येणार का ? मी तर जाणारचं आहे, असा इशारा दिला होता. या इशाऱ्याला भाजप नेते आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नितेश राणे म्हणाले, तारीख आणि वेळ कळवावी. आम्ही अनिल पराबांसाठी चहा तयार ठेवतो. अशा सुक्या धमक्या देऊ नयेत. कोर्ट कोर्टाचे काम करेल. आमच्या घरात येऊन धिंगाणा घालणे इतके सोपे नाही. कोणी यावं कुणी जावो, ही काही मातोश्री नाही. त्यांनी वेळ आणि तारीख कळवावी आम्ही त्यांचे असे स्वागत करू की ते पुन्हा राणे साहेबांच्या घरच्या इथे फिरणार नाहीत, असा इशारा दिलाय.
पुढे बोलताना दुसऱ्यांची घरं पाडण्याचे तक्रारी देणारी ही लोकं त्यांच्यासोबत नियती कधी न कधी खेळ करतेच. कधी राणे साहेबांचं घर तोडा, कधी कंगना राणावतचे घर तोडा, कधी दुसऱ्याला अटक करायला लावा. पुढे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांची पुन्हा जीभ घसरली.
उद्धव ठाकरेला स्वतःला हिम्मत नाही. कारण तो नामर्द आहे, अशी खालच्या पातळीची टीका केली. अनिल परबचे घर तर फक्त झाकी अजून मातोश्री तो बाकी आहे. दुसऱ्या मातोश्रीवर जेव्हा हातोडा पडेल तेव्हा दिसेल त्याच्यात पण खूप काही अनधिकृत अशा गोष्टी आहेत.
राणे साहेबांच्या घरावर तक्रार करण्याअगोदर उद्धव ठाकरे नावाचा तुझा बाप आहे. त्या बापाच्या घराच्या इथे बघ, मातोश्रीमध्ये नवीन घर तयार झाले आहे. त्यामध्ये शिवसेनेला एन्ट्री नाही, कुठल्याही शिवसेनेच्या शिल्लक सेनेच्या नेत्याला एन्ट्री नाही, अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.