Download App

Nitesh Rane on Sanjay Raut : …म्हणून मी पातळी सोडून बोलतो; राणेंनी सांगितली राऊतांविरोधातील युद्धनीती

Nitesh Rane on Sanjay Raut : भाजपचे आमदार आणि भाजपचा एक आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले नितेश राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील आरोप प्रत्यारोप रोज पाहाया मिळतात. त्यामध्ये अत्यंत खालच्या भाषेत केली गेलेली टीका पाहता. राज्यातील राजकारणाचा स्तर खालावत चालल्याचे दिसून येते मात्र आपण संजय राऊतांवर हा हल्लाबोल का? करतो यावर स्वतः भाजपचे आमदार नितेश राणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते लेट्सअप मराठीने ‘लेट्सअप सभा’ या मुलाखत कार्यक्रमात बोलत होते. ( Nitesh Rane Criticize Sanjay Raut on his offensive statements In Letsupp Sabha Special Interview )

Nitesh Rane on Love Jihad : लव्ह जिहाद विरोधात सगळी तयारी झालीये; नितेश राणेंनी सांगितला भाजपचा इनसाईड प्लॅन

संजय राऊतांवर हल्लाबोल का?

संजय राऊतांवर हल्लाबोल का? या प्रश्नाचं उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, ती मला पक्षाने दिलेली जबाबदारी आहे. आम्ही पक्षाने दिलेली जाबाबदारी पार पाडतो. त्याला 100 टक्के न्याय देतो. ती आमच्या राणेंची ओळख आहे. तर खालच्या पातळीवर बोलणं खुप लोकांना आवडत नसेल पम त्याचं कारण असं आहे की, ते ज्या पातळीवर बोलतात त्यांनी आमच्या वडिलांना शिवी घातलेली आहे. देवेंद्रजींच्या वजनावर ते बोललेले आहेत. मोदींवर खालच्या पातळीची टीका केली आहे. त्यामुळे युद्ध नितीच्या नियमानुसार जसा शत्रु तशी निती आखावी लागते त्यामुळे आम्ही ते खालच्या पातळीवर बोलल्यानंतर त्यांना तसंच उत्तर देतो.

Nitesh Rane : ‘मविआचं दुकान बंद होणार?’ उध्दव ठाकरेंच्या आमदारांचा ‘तो’ Video व्हायरल

राऊतांच्या खालच्या पातळीच्या वक्तव्याचा कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार, अजित पवार यांनी सगळ्यांनी निषेध केला. पण उद्धव ठाकरेंनी निषेध केला नाही. याचा अर्थ संजय राऊतांची भूमिका हीच उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. ठाकरेच त्यांनी तसे आदेश देतात का? प्रश्न निर्माण होतो. पण ते निषेध करत नाहीत. एवढचं नाही तर राऊतांच्या त्या थुंकण्याच्या वक्तव्यामुळे ठाकरेंच्या पक्षाची प्रतिमा मलिन झाली.

तर यावेळी नितेश राणे यांना राऊतांनी थुंकण्याच्या वक्तव्यावर दिलेल्या स्पष्टीकरणावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, संजय राऊतांची जीभ दाताखाली आली म्हणून ते पत्रकारांवर थुंकले तसा माझा ही हात खाजवत आहे. तर मी कुणाला कानफाटात मारले तर मी म्हणायचं का की माझी चूक नाही हाताता खाज आली. पण ते बाळासाहेबांचे कटवट शिवसैनिकच नाही. चायनिज आहे. जर असते त्यांनी शब्द फिरवला नसता थुंकले तर थुंकलेच म्हटले असते. तर अंगरक्षक सोडून फिरा मग कळेल.

तर मी त्यांचं पूर्ण नाव घेतो कारण बाळासाहेबांनीच शिकवलेल आहे अंगावर आले तर शिंगावर घ्या म्हणून ते सगळ्यांचे बाप काढतात म्हणून मी त्यांच पूर्ण नाव घेतो. मी त्यांचं पूर्ण नाव घेतो म्हणून तर त्यांच्या वडिलांच नाव कळालं. नाही तर लोकांच्याच वडिलांचं नाव ते लावतात. पण ठाकरे त्यांचा वापर करत आहेत. हे त्यांना आता नाही काही दिवसांनी कळेल. असं देखील यावेळी राणे म्हणाले.

Nitesh Rane Uncut Interview : नितेश राणे यांची सडेतोड मुलाखत…

भाजपचे आमदार आणि भाजपचा एक आक्रमक चेहरा म्हणून नितेश राणे यांच्याकडे पाहिलं जात. त्यांच्याकडून नेहमीच विरोधकांवर हल्लाबोल केला जातो. त्यांच्याकडून मुख्य करून ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जातो. त्याचबरोबर ते लव जिहाद, धर्मांतरण यासारख्या मुद्द्यांवर देखील आक्रमक पवित्रा घेत असतात. अशाच परखड नितेश राणेंची लेट्सअप मराठीने लेट्सअप सभा या मुलाखत सदराखाली मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी लव जिहाद, धर्मांतरण, शिवसेना आणि महाविकास आघाडी या व यासारख्या इतर अनेक राजकीय आणि सामाजिक विषयांवर आपली परखड भूमिका मांडली.

Tags

follow us