Download App

मनसेसोबतच्या युतीसाठी बायकोला विचारलं का? मनोमिलनाआधीच राणेंनी उडवली ठाकरेंची खिल्ली

Nitesh Rane Criticized Uddhav Thackeray Alliance With MNS : सध्या राजकीय वर्तुळात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. यावर मात्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी रविवारी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी हातमिळवणी करण्यापूर्वी, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची परवानगी घेतली होती का? असा सवाल नितेश राणेंनी (Nitesh Rane) केलाय.

ठाकरे बंधुंमध्ये युती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यावरून नितेश राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या पॉडकास्टमध्ये राणे म्हणाले की, तुम्ही उद्धव ठाकरेंना विचारले पाहिजे की, त्यांनी मनसेशी (MNS) हातमिळवणी करण्यापूर्वी रश्मी ठाकरे यांची परवानगी घेतली होती का? अशा निर्णयांमध्ये त्यांच्या मताला जास्त महत्त्व असते, असं देखील नितेश राणे यांनी म्हटलंय.

कालचक्र थांबवण्यासाठी 20 जूनला येतोय ‘समसारा’; सायली संजीव अन् ऋषी सक्सेना पुन्हा एकत्र

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये एक वळण आलंय. राज आणि उद्धव ठाकरे दोघांनीही महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी किरकोळ मतभेदांकडे दुर्लक्ष करू शकतात, असे सुचवत संभाव्य सहकार्याचे संकेत दिले आहेत. मी (राज ठाकरेंसोबत) एकत्र येण्यास तयार (Maharashtra Politics) आहे. किरकोळ घटना बाजूला ठेवून मी महाराष्ट्राच्या हितासाठी पुढे येण्यास तयार आहे. मी सर्व भांडणे संपवली आहेत. महाराष्ट्राचे हित माझे प्राधान्य आहे, असं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय कामगार सेनेच्या 57 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भाषण करताना सांगितलं आहे. राज ठाकरे यांनी देखील अशीच भावना व्यक्त केली, त्यांनी म्हटलंय की, एकत्र येणे कठीण नाही. चभावांमधील मतभेद महाराष्ट्र आणि मराठी लोकांच्या अस्तित्वासाठी महागडे ठरत असल्याचं बोललं जातंय.

राणे यांनी पुढे असा दावा केला की, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यावेळी दोन्ही भावांमध्ये कोणतेही मोठे मतभेद नव्हते. शिवसेना (यूबीटी) आणि महाराष्ट्र नवनिराम सेना यांच्यातील संभाव्य युतीबद्दल, राणे यांनी महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या निर्णायक विजयावर प्रकाश टाकला. त्यांच्यातील कोणत्याही युतीची चिंता नाही, असं देखील नितेश राणे यांनी ठामपणे सांगितलं आहे.

शेतकऱ्यांना बंदिस्त पाईपलाईनने पाणी देण्याचा विचार; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं की, त्यांचा पक्ष आणि मनसेमध्ये कोणतीही औपचारिक युती नाही, भावनिक चर्चा सुरू असल्याची पुष्टी राऊतांनी केली होती. युतीची कोणतीही घोषणा झालेली नाही. सध्या भावनिक चर्चा सुरू आहे, असं राऊत यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितलं होतं. ते भाऊ आहेत, कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये भेटतात असं देखील राऊत म्हणाले होते.

 

follow us