Nitesh Rane : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही सनातन धर्मावर (Sanatan Dharma) वादग्रस्त विधान केलं. सनातन धर्माने भारताचे वाटोळं केलंय. सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल. सनातनी दहशतवादाचे (Orthodox terrorism) अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे. भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला.
शाहरुखसोबत फिजिकल रिलेशन होते का?, प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाला?
खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदू धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा हाच आव्हाडांचा अजेंडा असतो. आव्हाड यांच्या या वक्तव्याशी शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे सहमत आहेत का?, असा सवाल राणेंनी केला.
‘हिंदू दहशतवाद’ किंवा ‘सनातनी दहशतवाद’ ही भाषा भारताच्या हिंदू आणि संत परंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली व्याख्या आहे. आधी सुशीलकुमार शिंदे मग पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड ती भाषा वापरत आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. जितेंद्र आव्हाड यांच्या…
— Nitesh Rane (@NiteshNRane) August 3, 2025
नितेश राणे यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, ‘हिंदू दहशतवाद’ किंवा ‘सनातनी दहशतवाद’ ही भाषा भारताच्या हिंदू आणि संत परंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली व्याख्या आहे. आधी सुशीलकुमार शिंदे मग पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड ती भाषा वापरत आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याशी शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे सहमत आहेत का? राष्ट्रवादी शरद पवार गटाचीही भूमिका हीच आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं, असं राणे म्हणाले.
शेवटच्या चेंडूवर चौकार अन् पाकिस्तानचा पराभव; थरारक सामन्यात वेस्टइंडिज विजयी
पुढं त्यांनी लिहिलं, खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदू धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा हाच आव्हाडांचा अजेंडा असतो. दहशतवाद हा हिंसेशी जोडलेला असतो, जिचा उद्देश लोकशाही, सहिष्णुता आणि समाजविरोधी कट रचणं असतो. सनातन हिंदू परंपरेचा इतिहास हा प्रश्नौत्तरं, संवाद, वैचारिक संघर्ष आणि लोकशाहीचं दर्शन आहे.
होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल ! सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे…
भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. बौद्ध भिक्खूंना मारणारे तत्कालीन सनातनी दहशतवादीच होते.
चार्वाकाला मारणारे सनातनी दहशतवादीच होते.
बसवेश्वरांना मारणारे… pic.twitter.com/ZNuxN4KPF0— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 2, 2025
महाराष्ट्राचे वाट्टोळे करू नका
‘सनातनी दहशतवाद’ हा शब्द वापरणं म्हणजे आपल्या इतिहासाची, हिंदू परंपरेची आणि सामाजिक क्रांतीच्या प्रवाहाची थट्टा करण्याचा प्रकार आहे. इथल्या हिंदू समाजानं तुमच्या ‘बाटग्या’ विचारांना कधी साथ दिली नाही आणि भविष्यातही ते देणार नाहीत. केवळ आपला एक मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे वाट्टोळे करू नका,