Nitesh Rane On Uddhav Thackeray : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे कायम ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कोंडीत पकडत असतात. ठाकरेंना टीका करण्याची आणि त्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी राणे सोडत नाहीत. आताही त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. इंडियाच्या (INDIA) बैठकीत ज्या ज्या राज्यांचे प्रतिनिधी येत आहे, त्यांच्या कर्नाटक, बंगाल या राज्यात हिंदूंवर होणारे हल्ले, लव्ह जिहाद, धर्मांतर याबाबत यजमान म्हणून उद्धव ठाकरे, शरद पवार जाब विचारणार का, असा सवाल राणेंनी केला.
३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडी दोन दिवसीय बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेससह इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी होणार असून काही राज्यांचे मुख्यमंत्रीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावरूनच आमदार राणेंनी ठाकरेंना थेट सवाल.
आज माध्यमांशी संवाद साधलतांना आमदार राणे म्हणाले की, विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते मुंबईत येत आहेत. इंडियाच्या मुंबईतील बैठकीसाठी, ज्या ज्या राज्यांचे प्रतिनिधी आहे, त्यांच्या राज्यात हिंदूवर अन्याय होतो. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आणि काँग्रेसशासित कर्नाटकामध्ये हिंदूंवर सातत्याने अत्याचार आणि हल्ले होत आहेत. त्या राज्यामध्ये होणाऱ्या हिंदू अत्याचार, लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर इंडियाच्या बैठकीचे संयोजक उद्धव ठाकरे, शरद पवार हे ममता बॅनर्जी आणि काँग्रेसला जाब विचारणार का? असा थेट सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना ‘इंडिया’आघाडीच्या बैठकीला? राजू शेट्टींनी दिलं उत्तर
राणे म्हणाले, काँग्रेसशासित कर्नाटक आणि ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये हिंदू महिलांवर लव्ह जिहाद आणि इतर मार्गांनी अत्याचार केले जात आहेत. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच स्वकीय मुस्लिमांची बाजू घेतली. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतातून हाकलून द्या, अशी भूमिका बाळासाहेबांनी सातत्याने घेतली होती.परंतु सध्याच्या परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांचे लाड केले जात आहेत. हिंदूवर हल्ले सूरू आहेत, त्यांचं धर्मांतर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बांगलादेशी आणि रोहिंगे बाबत बाळासाहेबांची जी भूमिका होती, ती ममता बॅनर्जींना सांगण्याची हिंमत उद्धव ठाकरे करणार का? आणि हिंदूंना न्याय देणार का? असा सवाल आमदार राणेंनी केला.