Nitin Deshmukh : ओरिजिनल दूध प्यायला असाल तर ठाकरेंना अडवून दाखवा

मुंबई : सोमवारी ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी शिंदे गट आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) फडतूस गृहमंत्री अशा शब्दात टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी धमकीवजा इशारा दिला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाचे […]

Untitled Design   2023 04 05T190626.279

Untitled Design 2023 04 05T190626.279

मुंबई : सोमवारी ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी शिंदे गट आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) फडतूस गृहमंत्री अशा शब्दात टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी धमकीवजा इशारा दिला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh यांनी बावनकुळेंचा जोरदार समाचार घेतला. बावनकुळेंनी ओरीजिनिल दुध प्यायलं नसल्याचं ते म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंवर टीका करतांना सांगितलं होत की, इथून पुढे फडणवीसांबद्दल जपूण बोला. अपशब्द वापराल तर तुम्हाला सोडणारा नाही, याला धमकी समजा, असा इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान, आता नितीन देशमुख यांनी बावनकुळेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.

देशमुख म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे हा प्रचंड मतिमंद माणूस आहे. मतिमंद काहीही बोलत राहिला तरी आपण दुर्लक्ष कराव. महाराष्ट्रातील जनता बावनकुळेंचं मनावर घेत नाही. कारण, मतिमंदाचं कोणी कानावरही घेत नसतं. जनतेला ठाऊक आहे की, चंद्रशेखर बावनुकळे हा माणूस मतिमंद आहेत. बावनकुळेंची लायकी आहे तरी काय? बावनकुळे हे उद्धव ठाकरेंना घराच्या बाहेर न निघू देण्याची भाषा करत आहेत. त्यांनी जर ओरिजिनल दूध प्यायलं असेल तर त्यांनी फक्त उद्धव ठाकरेंना अडवून दाखवावं, असं चॅलेंज केलं आहे.

ठाण्यात येणार अन् जिंकूनच दाखवणार; आदित्य ठाकरेंचे शिंदेंना चॅलेंज ! 

देशमुख यांनी फडवीसांवरही टीका केली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे अक्षरश: जनतेच्या जीवाशी खेळत आहेत. ईडीच्या धाडी टाकून एखाद्याच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा ते प्रयत्न करतात. काल ठाण्यात एक महिलेला मारहाण करण्यात आली. आणि ते गृहमंत्री असूनही काहीच करत नाहीत. उलट रोशनी शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. हे जनतेच्या जीवाशी खेळणं नाही, तर काय म्हणाव. तुम्हीच सांगा? उध्दव ठाकरेंनी त्यांच्याविषयी जो फडतूस शब्द वापरला, तो योग्यच आहे. मी काडतूस आहे, आणि घुसतो, असं फडणवीस म्हणतात. या महाराष्ट्रात तुमची काही किंमत नाही. महाराष्ट्र कर्तृत्व मान्य करत नाही. महाविकास आघाडीच्या सभेला झालेली गर्दी ही केवळ उद्धव ठाकरेंसाठी झाली नव्हती, असं ते सांगतात. मला सांगायचं आहे की, ठाकरेंच्या सभेला लाखोंची गर्दी होत आहे. आज त्यांच्याकडे पक्ष नसतांना, आमदार नसतांना लोक त्यांच्या सोबत आहे. तुम्ही एकदा पक्षातून बाजूला व्हावं, आणि सभा घेऊन दाखवावी, असं आव्हानही त्यांनी केलं.

 

Exit mobile version