Download App

सत्ता संघर्षाच्या सुनावणीनंतर नितीश कुमार यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘जास्तीत जास्त पक्षांनी….’

Nitish Kumar On Supreme court decision : महाराष्ट्र सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निकाल दिला आहे. महाराष्ट्रातील सत्ताबदलाच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांवर न्यायालयाने आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. शिंदे गटाला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. त्याचवेळी न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवले आहे. त्यांनी यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी यावर पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिंदे गटासह फडणवीसांवर टीकास्त्र डागलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव उपस्थित होते. दोघांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नितीश कुमार यांनीही या निर्णयावर भाष्य केलं. ते म्हणाले की, भाजप वेगवेगळ्या राज्यातील प्रादेशिक पक्षांवर सुडाच्या कारवाया करत आहे. छोट्या-छोट्या पक्षांना संपवण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. त्यामुळं जास्तीत जास्त पक्षांनी मिळून एकत्र भाजपविरोधात एकत्र येऊन काम करावं. त्याअनुषंगाने माझी अनेकांशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

लोकशाहीचा विजय, दिल्ली सरकारच्या विजयानंतर अरविंद केजरीवालांचं ट्विट…

ते म्हणाले, आम्हा सगळ्यांचा विचार एकच आहे. मात्र, देशात लोकशाही संपुष्टात येत आहे. देशहित बाजूला केवळ सत्तेच्या लालसेपाई विरोधकांना अडणीत आणण्याचे प्रयत्न होत आहेत. देशात विरोधी पक्षच उरू नये, असं भाजपच्या एकंदरीत भूमिकेवरून दिसतं. मात्र, देशाचं विरोधी पक्ष असणं फार गरजेचं आहे. त्यामुळं आता देशाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं. लवकरच सर्व विरोधी पक्षाची बैठक होईल, असंही नितीशकुमार म्हणाले.

माध्यमांवरही सत्ताधारी पक्षाचा दवाब असल्याच नितीशकुमार यांनी सांगितलं. वेगवेगळ्या राज्यात जे सरकारं अस्तित्वात आहेत, त्यांच्या कामाचा गवगवा माध्यमं करत नाहीत. मात्र, भाजप सरकारच्या कामांचा मोठा गवगवा माध्यमं करतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग, राज्यपाल हे ब्रह्मा नाहीत. नैतिकता असेल तर शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले. पक्षाला नाव देणे हा निवडणूक आयोगाचा अधिकार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

 

 

Tags

follow us