Download App

Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराला राष्ट्रीय नेतृत्त्वाचा ग्रीन सिग्नल नाहीच, आमदारांची प्रतिक्षा वाढली

  • Written By: Last Updated:

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार ? याकडे सर्वांचा लक्ष लागले आहे. मात्र आता पुन्हा एकदा हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. कारण या मंत्रिमंडळ विस्ताराला राष्ट्रीय नेतृत्त्वाचा ग्रीन सिग्नल नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

त्यामुळे आता राज्यसरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वी होणार नाही. असं देखील सांगितलं जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रीपद मिळण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. याअगोदर अनेकदा राज्यसरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या चर्चा झाल्या आहेत.
Eknath Shinde : …म्हणून उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली

राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री शिंदे यांच्याशिवाय त्यांच्या गटाचे फक्त 9 मंत्री आहेत. प्रत्यक्षात शिंदेसोबत शिवसेनेचे 40 आमदार आणि 10 अपक्ष आले आहेत. त्यातील अनेकांना मंत्रिपदाचे आश्वासन दिलेले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटातील आठ-दहा नव्हे तर तब्बल 32 जण मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले आहेत.

त्यातील किमान 14 जण मंत्रिपदावर पक्का दावा सांगतात. अपक्षांनाही स्थान द्यावे लागेल. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जे मंत्री होते (उदाहरणार्थ बच्चू कडू) अशा नेत्यांनाही मंत्रिपद द्यावे लागेल. ही सर्व स्थिती पाहता मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता दाट दिसते. मात्र या विस्ताराची कोणतीही निर्णयसूत्रे महाराष्ट्रात कुणाकडेही नाहीत. या संदर्भातील निर्णय दिल्लीतच होईल असं देखील बोललं जात.

Tags

follow us