Laxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) निवडणुकीला उभे राहणार नाहीत, ना माणसे उभे करतील, कोणत्याही पक्षाला मदत करतील, या पलीकडे त्यांची कुवत हैसियत नाही, असा सणसणीत टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे यांना मारलायं. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष सुरु आहे. एकीकडे मनोज जरांगेंकडून सडकून टीका केली जातेयं तर दुसरीकडे लक्ष्णम हाकेंकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यावर बोलताना हाकेंनी टोला लगावलायं. ते पुण्यात बोलत होते.
‘हे माझं शेवटचं ऑलिम्पिक होतं’; भारतीय बॅडमिंटन खेळाडू अश्विनी पोनप्पाकडून निवृत्तीची घोषणा
लक्ष्मण हाके म्हणाले, मी जर तरच्या गोष्टींवर बोलणार नाही. मनोज जरांगे यांच्या मागण्या संविधानाला धरुन नसून आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत आहोत. मनोज जरांगे आता उघड झाले असून त्यांना राजकीय भूमिका घेण्याशिवाय पर्याय नाही. मनोज जरांगे ना निवडणुकीला उभे राहतील ना माणसे उभे करतील. ते कुठल्यातरी एका पक्षाला मदत करतील या पलीकडे त्यांची ना कुवत आहे ना हैसियत असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
तसेच मनोज जरांगेंनी लोकसभा निवडणुकीत कोणाला सपोर्ट केलाय हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. ते याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेणार नाहीत. ते ज्या पद्धतीने एखाद्या पक्षाच्या प्रमुख नेत्यावरती शिवराळ भाषेमध्ये, खालच्या भाषेमध्ये टीका करतात. जरांगे नावाचा व्यक्तीमुळे महाराष्ट्राचा स्टॅंडर्ड धुळीस मिळाला असल्याचीही टीका हाके यांनी केलीयं.
video: काळीज पिळवटून टाकणारी दृष्य; आम्हाला वाचवा, वायनाड भूस्खलन दुर्घटेतील लोकांची आर्त हाक
दरम्यान, येत्या 11 ऑगस्टला सांगलीमध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा OBC मेळावा आयोजित करण्यात आला असून सध्या महाराष्ट्रात तणाव आहे. इकडे एखादी रॅली निघाली की तिकडे त्याला प्रती रॅली निघते. लोकप्रतिनिधी ठाम भूमिका घ्यायला तयार नाहीत. लोकप्रतिनिधी ओबीसींच्या मागासवर्गीयांच्या आरक्षणावर बोलायला तयार नाही. प्रत्येक विधानसभेतील आमदाराला आम्ही प्रश्न विचारणार आहोत. ज्यांनी ओबीसींचा आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, त्यांना आम्ही मतदान करणार नाही अशा शपथा आम्ही घेणार असल्याचं लक्ष्मण हाकेंनी स्पष्ट केलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वजातीला एंटरटेन केलं :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील 12 कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहेत. मात्र, त्यांनी आत्तापर्यंत स्वजातीच्या आंदोलनालाच एंटरटेन केलं आहे. शिंदे यांनी पुढे येऊन सांगावं की मी सर्वच निर्णय हिताचे घेत आहे. ओबीसी आरक्षणावर डोळेझाक करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कसा? असा थेट सवाल हाके यांनी केलायं.