जरांगेंची मागणी इनलॉजिकल, त्यांचा सल्लागार कोण? कळतच नाही, लक्ष्मण हाकेंनी वाभाडेच काढले

जरांगेंची मागणी इनलॉजिकल, त्यांचा सल्लागार कोण? कळतच नाही, लक्ष्मण हाकेंनी वाभाडेच काढले

Laxman Hake On Manoj Jarnage : मनोज जरांगे (Manoj jarange) यांची मागणी इनलॉजिकल असून त्यांचा सल्लागार कोण? हे कळतच नसल्याचं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे यांचे वाभाडेच काढले आहेत. दरम्यान, एकीकडे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे ठाम आहेत तर दुसरकीडे ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) संरक्षणासाठी लक्ष्मण हाके लढत आहेत. मनोज जरांगे यांनी मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारला 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलायं, तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचं आश्वासन लक्ष्मण हाके यांना देण्यात आलंय. एकंदरीत या संघर्षामध्ये मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्यात वाकयुद्ध रंगलंय.

ओठांना लिपस्टिक अन् हातात बांगड्या; पोलीसही हैराण, आत्महत्येपूर्वी अधिकारी का बनला महिला?

हाके पुढे बोलताना म्हणाले, मनोज जरांगे काय मागणी करतात, तेच समजत नाही. इनलॉजिकल गोष्टींची ते मागणी करत असतात, त्यांचा कोण सल्लागार आहे, मला कळत नाही. आरक्षणाच्या नावाखाली प्रचंड पॉलिटिकल सुरु असून त्यांचा अजेंडा आहे. आरक्षणाची मागणी करत लोकांना भावनिक करायचे. तरुणांना दाखवायचं एक आणि यांच्या कृती मात्र वेगळ्या असून ते कुणाच्या बाजूने बोलतात. कुणाचा प्रचार करतात, हे जनतेला माहीत असल्याचं हाकेंनी स्पष्ट केलंय.

तसेच ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आंदोलनं तर झालीचं पाहिजेत. आपले हक्क, अधिकार मागण्यांसाठी आंदोलनं करावी लागतात. काळं फासणं तर योग्य नाही, शासनाने याकडे लक्ष द्यावे, अन्यथा आणखी काही अघटित घडण्याची शक्यता असल्याची भीती लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलीयं.

मोठी बातमी! ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीत लातूरचे धागेदोरे दिल्लीपर्यंत, मुख्याध्यापकास पोलीस कोठडी

मागील काही दिवसांपासून मराठा बांधव आणि ओबीसी बांधव एकमेकांसमोर उभे ठाकल्याची परिस्थिती आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजाकडून लावून धरण्यात येत आहेत. तर ओबीसी समाजाकडून मराठा बांधवांच्या मागणीला कडाडून विरोध केला जात असल्याची परिस्थिती आहे. अशातच ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ लक्ष्मण हाके यांनी अंतरवली सराटी गावाच्या शेजारील वडीगोद्री गावात तब्बल 10 दिवस आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता. अखेर सरकारच्या शिष्टमंडळाने आश्वासन दिल्यानंतर उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. तर मनोज जरांगे यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे 13 जुलैपर्यंतचा वेळ दिलायं.

मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांचे उपोषण स्थगित झाल्यानंतर दोघांकडूनही एकमेकांवर टीका-टीप्पणी केली जात आहे. शिंंदे समितीला फक्त मराठा समाजाचेच नाही तर ब्राम्हण, जैन, मुस्लिम समाजाच्या कुणबीच्या नोंदी आढळून आलेल्या आहेत. या समाजालाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलीयं. त्यावर बोलताना हाके यांनी जरांगे यांचे वाभाडेच काढले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज