Download App

यूपी-बिहारसारखाच हिंसाचार राज्यात सुरू होईल, मराठा-ओबीसी वादावर राज ठाकरे स्पष्टच बोलले

जातीपातीचं विष शाळा-कॉलेजपर्यत जाईल. जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवलं पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.

  • Written By: Last Updated:

Raj Thackeray : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (OBC reservation) मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सातत्याने आंदोलन करत आहेत. तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यात सध्या मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद चांगलाच तापला आहे. यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भाष्य केलं.

शर्वरी वाघ ठरली Munjya चा सर्वात मोठा सरप्राईज फॅक्टर; म्हणाली मला खूप… 

विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीनंतर राज यांनी राज्यात जातीय आरक्षणाबाबत सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणाले की, या जातीच्या वादातून काही निष्पन्न होणार नाही, हे मी गेली अनेक वर्षे संपूर्ण समाजाला सांगत आलो आहे. हे सर्व नेते जातीजातींमध्ये द्वेष पसरवतील आणि फक्त मते घेतील.
काल मला कुणीतरी एक क्लिप पाठवली ज्यात लहान लहान मुलं जातींवर बोलत हती. मी फार पूर्वीच म्हणालो होतो की, हे जातीपातीचं विष शाळा-कॉलेजपर्यत जाईल. जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवलं पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.

Akshay Kumar: खिलाडी कुमारच्या ‘सरफिरा’ सिनेमातील पहिले धमाकेदार ‘मार उदी’ गाणे प्रदर्शित 

ते म्हणाले, महाराष्ट्रात जातीपातीचे विष कधीच नव्हते. कितीही आवडणार पक्ष असेल किंवा नेता असेल तरी जर विष कालवणार असतील तर पुढच्या पिढीनं जगायचं कसं? महाराष्ट्राचे काय होणार? ज्या प्रकारे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये सुरू आहे, तसं महाराष्ट्रातही यावरून रक्तपात होईल, अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

लोकसभेला भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे स्वबळावर लढणार का? असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला असता राज ठाकरेंनी आत्ताच सांगू? अशी विचारणा केली. यासंदर्भात अद्याप मनसेकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.

follow us

वेब स्टोरीज