Download App

One Nation One Election हा मोदी सरकारने सोडलेला फुगा, भाजप ‘इंडिया’ला घाबरलंय; राऊतांचं टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

One Nation One Election : ‘पंतप्रधान मोदींच्या सरकारने काल एक देश, एक निवडणूक (One Nation One Election) हा एक नवा फुगा हवेत सोडला आहे. हे राजकीय फंडे आहेत. भाजप इंडिया आघाडीच्या ताकदीला घाबरलेलं आहे. त्यामुळे त्या माथेफिरूपणातून सुचलेल्या या आयडिया आहेत.’ असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक देश, एक निवडणूक यावरून भाजपवर आणि मोदी शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Aparna P Nair Death: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा राहत्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

संजय राऊत काय म्हणाले?

पंतप्रधान मोदींच्या सरकारने काल एक देश, एक निवडणूक (One Nation One Election) हा एक नवा फुगा हवेत सोडला आहे. त्या अगोदर त्यांनी जम्मू कश्मीरच्या मुद्द्यावर एक देश एक संविधानची घोषणा केली. जम्मू कश्मीरसाठी असलेलं कलम 370 हटवलं. मात्र त्याच काहीही झालं नाही. सर्वात पहिले जम्मू कश्मीरमध्ये निवडणुका घेणे गरजेचे आहे. मणिपूरमध्ये देखील तिच स्थिती आहे. वन इलेक्शन आधी या देशामध्ये फेर इलेक्शन व्हायला हवेत.

Anand L Rai यांच्या ‘शुभ मंगल सावधान’ सिनेमाला 6 वर्षे पूर्ण; निर्मात्याने खास पोस्ट शेअर करत म्हणाला…

तसेच देशात भ्रष्ट निवडणुक आयोग काम करत आहे. तो अगोदर हटवणे गरजेचे आहे. कारण भ्रष्ट आणि दबावाखाली काम करणारं इलेक्शन कमिशन जो पर्यंत आहे तोपर्यंत देशाीत फेर निवडणुका होणार नाही. तर एक देश, एक निवडणूक हे राजकीय फंडे आहेत. भाजप इंडिया आघाडीच्या ताकदीला घाबरलेलं आहे. त्यामुळे त्या माथेफिरूपणातून सुचलेल्या या आयडिया आहेत. असं म्हणत केंद्र सरकारच्या एक देश, एक निवडणूक (One Nation One Election) या विधेयकावर टीका केली आहे.

https://youtu.be/5iLK1w52Pm0?si=ctFZ1VS_JihDca6z

त्याचबरोबर यावेळी राऊत यांनी इंडिया आघाडीच्या लोगोचं आज किंवा उद्या दिल्लीत अनावरण होऊ शकतं. इंडिया आघाडीच्या लोगोवर दोन दिवस चर्चा करण्यात येणार आहे. इंडिया आघाडीत प्रत्येकाला सामावून घेणार. डिया आघाडीतील विविध समित्यांबाबत आज चर्चा करायची आहे. अशी माहिती दिली. तर ते पुढे म्हणाले एक निवडणूकीपूर्वी पारदर्शक निवडणूक घ्या. इंडिया आघाडीच्या बैठकीवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न. आहे.

Tags

follow us