Aparna P Nair Death: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा राहत्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

  • Written By: Published:
Aparna Nair

Aparna P Nair Death: दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री अपर्णा नायर (Aparna P Nair ) हिचा मृत्यू झाला आहे. अपर्णा तिच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळली आहे. अभिनेत्री अपर्णा तिच्या थलीयिल, करमाना येथील घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. प्रथमदर्शी तिनं आत्महत्या केल्याचं दिसून आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by aparna nair official (@aparna_nair_actress)


पोलिसांनी अभिनेत्रीच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्रीच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे. तिच्या मृत्यूच्या पाठीमागे काही घातपात आहे का? याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यामध्ये घेतला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. अभिनेत्रीच्या मित्रांचा आणि नातेवाईकांचा सध्या जबाब नोंदवण्यात आला आहे.

वयाच्या केवळ 31व्या वर्षी अभिनेत्री अपर्णा नायरच्या झालेल्या धक्कादायक मृत्यूनं तिच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना चांगलाच मोठा धक्का बसला आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्रीच्या सुमारास अभिनेत्री अपर्णा नायर तिच्या घरी मृतावस्थेत आढळली आहे. तिचा मृत्यू झाला तेव्हा तिची आई आणि बहिण घरीच होते . दोघींनी अपर्णाला तिच्या खोलीमध्ये लटकलेल्या अवस्थेत बघितलं आहे. कुटुंबियांनी तात्काळ तिला हॉस्पिटलमध्ये नेलं परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मृत्यूनंतर डॉक्टरांनी तिचा मृतदेह अद्याप हॉस्पिटलमध्येच ठेवला आहे.

Sunny leone: IFFSA कॅनडा येथे सनी लिओनीच्या ‘केनेडी’चं होणार खास सन्मान

अभिनेत्री अपर्णा नायरचं लग्न झालं आहे. संजित असं तिच्या नवऱ्याचं नाव आहे. तिला दोन मुलं देखील आहेत. तिच्या निधनानं तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का सहन करावा लागत आहे. दोन लहान मुलं आईविना पोरकी झाली आहेत. संपूर्ण दाक्षिणात्य इंडस्ट्रीतून अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली जात आहे. अभिनेत्री अपर्णाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिनं मेगाथीर्थम, मुधुगौव, अचयन्स, कोडथी समक्षणम बालन वकील, कल्कि सारख्या सिनेमात काम केलं आहे. तसेच चंदनमाझा आणि आत्मखी सारख्या सीरियलमध्ये देखील तिनं महत्त्वाच्या भुमिका साकारले आहेत.

Tags

follow us