Download App

अन्यथा सीमाभागातील मराठी ठसा पुसला जाईल; उद्धव ठाकरेंचा इशारा

  • Written By: Last Updated:

नागपूर : सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकार आक्रमकपणे पावले टाकत आहे पण याउलट महाराष्ट्र सरकार आपल्या संस्काराप्रमाणे शांतपणे वागत आहे. त्यामुळे जर अशीच परिस्थिती राहिली तर सीमाभागातला मराठी ठसा पुसला जाईल, अशी भीती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केली. ते आज नागपुरात विधीमंडळ अधिवेशनात कर्नाटक सरकारविरोधात ठराव संमत केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि सीमाभागताला मराठी ठसा पुसला जाऊ नये यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जेव्हा आदेश दिला होता तेव्हाची आणि आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करून न्यायालयाला विनंती करून सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली पाहिजे. कर्नाटक सरकारकडून होत असलेले भाषिक अन्याय न्यायालयासमोर मांडले पाहिजेत.

राज्य सरकारकडून आजच्या ठरावामध्ये महाराष्ट्रातल्या योजना सीमाभागात राबनवणार असल्याची घोषणा केली. त्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की एका राज्यातला योजना दुसऱ्या राज्यात राबवता येतात कि नाही माहित नाही. पण कर्नाटक सरकार महाराष्ट्राच्या मंत्र्यांना राज्यात येऊ देत नाही, तिथे योजना कशा राबवू देतील असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. सोबत सीमाभागातल्या मराठी जनतेला कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली पाहिजे. अशी मागणीही त्यांनी केली.

Tags

follow us