Muslim men use condoms the most : लोकसभेच्या मैदानात प्रचारसभा सुरू असताना अनेक विषयांवरून वार प्रतिवार सुरू असतात. कोण कोणत्या भाषेत कुणावर टीका करेल आणि कोण कोणत्या भाषेत कुणला उत्तर देईस याचा काही नेम नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अनेक ठिकाणी पंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर अनेक आरोप केले आहेत. तसंच, मुस्लिम लोकसंख्येवरूनही मोदींनी अनेक ठिकाणी जोरदार टीका केली आहे. त्याला उत्तर देताना एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार पलटवार केला आहे.
प्रजनन दर घटला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीवर टीका केली. परंतु, आपलं सरकार सांगत आहे की सर्वात जास्त प्रजनन दर कुणाचा घसला असेल तर तो मुस्लिम समाजाचा आहे. तसंच, सर्वात जास्त कंडोमचा वापर कोण करत असेल तर मस्लिम सामाजातील पुरुष करतात असा थेट दावा करत ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. गेल्या आठवड्यात राजस्थानमधील रॅलीत पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास मस्लिमांना संपत्ती वाटपाला प्राधान्य देईल असा आरोप केला होता. त्यावर ओवेसी बोलत होते.
द्वेशाची भिंत उभी करत आहात
यावेळी बोलताना ओवेसी म्हणाले, आमचा धर्म वेगळा आहे. परंतु, आम्ही एक भारतीय आहोत. तुम्ही किती दिवस असं हिंदू-मुस्लिम राजकारण करणार आहात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसंच, तुम्ही आमच्यात आणि हिंदुंमध्ये द्वेषाची भिंत का उभी करत आहात? असा प्रश्न उपस्थित करत देशात हिंदूंमध्ये मुस्लिम बहुसंख्य समाज होईल अशी खोटी भीती निर्माण करत असल्याचा घणाघाती आरोप ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे.
बेपत्ता मुलींवर बोरणार नाहीत
यावेळी ओवेसी यांनी आरएसएसचाही समाचार घेतला. ते म्हणाले, मुस्लिमांमध्ये एका पाठोपाठ मुलं जन्माला घालण्याचं अंतर वाढलं आहे. परंतु, त्याबद्दल कोणी बोलत नाही. 2000 ते 2019 पर्यंत अनेक हिंदू मुली बेपत्ता आहेत. परंतु, हे लोक बेपत्ता मुलींबद्दल बोलणार नाहीत. आमच्यावर टीका करतील. तसंच, आमच्यावर धर्म आधारित लोकसंख्या समतोल राखला पाहिजे असं म्हणत टीका करतात अशा शब्दांत ओवेसी यांनी मोहन भागवत यांच्यावर नाव घेत टीका केली.