Download App

P. N. Patil : आमदार स्वतःहून चौकशीसाठी ईडी समोर हजर; पण चौकशी झालीच नाही, काय आहे प्रकरण

  • Written By: Last Updated:

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (KDCC) कर्जवाटपात माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर झालेल्या छाप्यानंतर कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात खळबळ माजली होती. त्यानंतर याच प्रकरणात बँकेच्या पाच अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. तसेच तीन माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील (PN Patil) सुद्धा ईडीच्या रडारवर आले आहेत. पी. एन. पाटील हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असून ते आज स्वतःहून मुंबई येथील ईडी (ED Office) कार्यालयात दाखल झाले. मात्र, आज त्यांची चौकशी करण्यात आली नाही.

पोलिस शिंदे-फडणवीस सरकारचे घरगडी झालेत, ठोंबरे-पाटील कडाडल्या…

पी. एन. पाटील यांना यापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये ईडीकडून समन्स जारी करण्यात आले होते. मात्र, ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते. त्यामुळे आज कार्यालयात येऊनही त्यांची चौकशी होऊ शकली नाही. त्यांना आता आठवडाभरात नव्याने समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आता आणखी एका मोठ्या नेत्याची चौकशी या अनुषंगाने होत आहे.

प्रकरण नेमकं काय ?

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मधील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि गडहिंग्लज तालुक्यातील अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना कर्जपुरवठा प्रकरणी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (KDCC ED Raid) ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.

Fadnavis Vs Thackeray : ‘फडतूस’ शब्दांचा अर्थ राऊतांनी सांगितला, पण खरा अर्थ काय?

या प्रकरणात आतापर्यंत ईडीकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर (Hasan Mushrif) तीनवेळा छापेमारी करण्यात आली आहे. याशिवाय आणखी काही संचालक आणि अधिकारी यांची चौकशी करण्यात अली आहे.

 

Tags

follow us