Fadnavis Vs Thackeray : ‘फडतूस’ शब्दांचा अर्थ राऊतांनी सांगितला, पण खरा अर्थ काय?

  • Written By: Published:
Fadnavis Vs Thackeray : ‘फडतूस’ शब्दांचा अर्थ राऊतांनी सांगितला, पण खरा अर्थ काय?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना फडतूस म्हटले होते. यावरुन भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत मी फडतूस नाही तर काडतूस असल्याचे म्हटले आहे. यावरुन संजय राऊतांनी आता पुन्हा फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी सांगितला अर्थ

डिक्शनरीमध्ये फडतूसचा अर्थ हा मिनींगलेस व वर्थलेस असा आहे. बिनकामाचे लोक असा याचा अर्थ होतो. हे सरकार बिनकामाचे आहे, त्याला फडतूस शब्द वापरला आहे आणि हा फडतूस शब्द वापरल्याने भिजलेलं काडतूस एवढे आत जायची काय गरज आहे. तुम्ही काडतूस असाल पण अशी भिजलेली काडतूसं महाराष्ट्राने भरपूर पाहिली आहेत. भिजलेलं काडतूस उडत नाही.

तुमचं खरं काडतूस ईडी व सीबीआय आहे, म्हणून तुमच्यामध्ये मस्ती आहे. हे तुमचं ईडी व सीबीआय बाजूला ठेवून या मग आम्ही काडतूस कुठे घुसतं ते दाखवतो, असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

Sushma Andhare; याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आलं असेल?

‘फडतूस’ शब्दाचा अर्थ काय?

खरंतर कालपासून हा शब्द इतक्या वेळा ऐकलं किंवा वाचला असेल. त्यावरून त्याचे अनेक अर्थ तुमच्या डोक्यात आले असतील. पण याचा नेमका अर्थ काय हे आपण पाहू. तर फडतूस हा शब्द तसा शेतीशी संबंधित आहे. तो सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा असेल तर या शब्दाची फोड करून आपल्याला तो समजून घ्यावा लागेल. तर याची फोन केली तर दोन शब्द होतात तर असे एक म्हणजे ‘फड’ आणि दुसरा ‘तूस’

गावाकडे धान्यांची तोडणी करुन आणलेल्या कणसांचा किंवा धान्याचा ढीग ज्या मोकळ्या जागी ठेवला जातो, त्याला ‘फड’ असं म्हणतात. आणि शेतात पिकलेलं धान्याची मळणी झाल्यांनतर जे त्यावरील फोलपटे किंवा धान्यावरील सालाला ‘तूस’ असं म्हणतात.

तर यानंतरचा मुद्दा म्हणजे धान्यांची मळणी झाल्यानंतर धान्य आणि तूस वेगळी करण्यासाठी ते उफणलं जात. म्हणजे वाऱ्याच्या दिशेला धान्य उंचावरून खाली टाकला जात. त्यावेळी त्यातील ती तूस किंवा फोलपटे वाऱ्यामुळे उडून एका बाजूला पडतात. ते एका बाजूला पडून त्याचा जो ढीग पडतो, त्याला ‘फडतूस’ म्हणतात.

एकप्रकारे फडतूस म्हणजे हा पडलेला ढीग टाकाऊ असतो. त्याचा शेतकऱ्याला खायला उपयोग नसतो. त्यामुळे काही कामाचा नसलेला या अर्थाने फडतूस हा शब्द वापरला जातो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube