परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे व धनंजयच मुंडे या बहीण-भावात विकास कामाच्या निधीवरून चांगला संघर्ष रंगला आहे. मी मागच्या पाच वर्षांमध्ये नुसती काम दिली. नारळ कोणी फोडले? हे माहित नाही. मात्र आता नारळ फोडून हात दुखत आहेत. मी कधी श्रेय घेण्यासाठी आले नाही, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे.
पण आता बोलणाऱ्याचे अंबाडे विकतात आणि नाही बोलणा-यांचे गहू देखील विकत नाही. याचं उदाहरण देत पंकजा मुंडेंनी श्रेय वादावरून अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. आता मला बोलण्याची वेळ आली आहे. लोकांना वाजून सांगितलं नाही तर लोकांच्या लक्षात येणार नाही, असे त्या म्हणाल्या आहेत.
Sanjay Gaikwad : वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय गायकवाडांची अधिकाऱ्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल
यावेळी पंकजा मुंडे परळी तालुक्यातील शेलु येथे जलजीवन मिशन अंतर्गत विकास कामाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या. पंकजा मुंडे या गावात दाखल होताच जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत फटाक्यांची आतश बाजी करत त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं.
राज्य विधानसभा निवडणुका लोकसभेसोबत, महाराष्ट्र भाजपचा केंद्रीय नेतृत्वाला प्रस्ताव
दरम्यान, 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. आता पंकजा मुंडे पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या कामाला लागल्याचे दिसते आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या परळीमध्ये विविध कामांचे लोकार्पण व भूमीपुजन करताना दिसत आहेत. त्यातच लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुक होण्याची चिन्हं दिसत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यासाठी आधीपासूनच तयारीला लागल्याचे पहायला मिळते आहे.