Download App

Pankaja Munde या धनंजय मुंडेंना सोपे सोडणार नाही… परळीतूनच लढणार !

  • Written By: Last Updated:

Pankaja Munde On Parli Assembly constituency

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यामध्ये मनोमिलन झाले आहे. दोघांतील राजकीय संघर्ष टाळण्यासाठी पंकजा मुंडे या सुरक्षित मतदारसंघ शोधत असल्याच्या राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. तर पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातून पंकजा मुंडे या निवडणूक लढवतील, असे बोलले जात होते. परंतु आता पंकजा मुंडे यांनी स्वतःच या चर्चाची हवा काढून घेतली आहे. मी माझ्याच परळी मतदारसंघातून लढणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी बीड येथे स्पष्ट केले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष सुरूच राहणार आहे.

Letsupp Special : Ajit Pawar यांचा स्पष्टवक्तेपणा अशा वेळी कोठे जातो?

माझे कार्यकर्ते, समर्थक मला राज्यातील 25 हून अधिक मतदारसंघातून उभे राहा असे म्हणतात. ते कार्यकर्त्यांचे प्रेम आहे. मी पाथर्डीतून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची अफवा पसरू नका. मी माझ्याच मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

Devendra Fadnavis ; ‘भेगा पडलेली वज्रमूठ आमचा सामना करु शकत नाही’

पाथर्डीतील भारजवाडी येथील नारळ सप्ताहासाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एका व्यासपीठावर आले होते. दोघे एकमेंकावर भरभरून बोलले होते. त्यामुळे दोघांमधील कौटुंबिक कटुता संपली. तर पंकजा मुंडे यांनी परळी मतदारसंघाएेवजी दुसरा मतदारसंघ शोधल्यास दोघांतील राजकीय संघर्ष संपेल, असे बोलले जात होते. पण आज पंकजा मुंडे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

त्याला वेगवेगळ्या बाजू आहेत. पंकजा मुंडे यांनी दुसरा मतदारसंघ शोधल्यास त्यांच्यावर पळ काढल्याचा आरोप होईल. तर पाथर्डी मतदारसंघ पंकजा मुंडे यांना सोडण्यासाठी भाजप पक्ष तयार होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व राजकीय परिस्थितीमुळे पंकजा मुंडे यांनीही परळीतून निवडणूक लढवली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

Tags

follow us