Devendra Fadnavis ; ‘भेगा पडलेली वज्रमूठ आमचा सामना करु शकत नाही’

Devendra Fadnavis ; ‘भेगा पडलेली वज्रमूठ आमचा सामना करु शकत नाही’

Devendra Fadnavis on Maharashtra politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) छत्रपती संभाजीनगरनंतर वज्रमूठ सभा झाल्यानंतर नागपूरमध्ये होणार आहे. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांच्या वज्रमुठीला भेगा पडल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीच्या वज्रमुठीचा फोटो मी पाहिला, त्याला भेगा पडलेल्या दिसत आहेत. अशी भेगा पडलेली वज्रमुठ आमचा मुकाबला करू शकत नाही. आमची वज्रमूठ ही विकासाची आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केला. वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथे भाजपाच्या संकल्प सभेत ते बोलत होते.

गडकरींना धमकी देणाऱ्या आरोपीचे दाऊद, लष्कर-ए-तोयबाशी संबंध!

देवेंद्र फडणवीस पुढं म्हणाले की, महाविकास आघाडीची अवस्था वाईट आहे. पहिला भोंगा सकाळी 9 वाजता वाजतो. त्याविरोधात दुसरा भोंगा दुपारी 12 आणि सायंकाळी तिसरा भोंगा पहिल्या दोघांनाही खोडून काढतो. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक नाकर्ते सरकार आपल्याला अडीच वर्ष पहायला मिळाले, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

समृद्धी महामार्गामुळे आजवर वेगळ्या पडलेल्या वाशिमला मोठी कनेक्टिव्हीटी मिळाली. संत सेवालाल महाराजांच्या पोहरादेवीला आम्ही आमच्या काळात निधी दिला. पण, महाविकास आघाडीने अजीबात निधी दिला नाही. आता आपण पुन्हा अर्थसंकल्पात निधी मंजूर केला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Narayan Rane : विरोधकांकडे बोंबलाय शिवाय काही नाही, राणेंचा मविआला टोला

शेतकर्‍यांना एनडीआरएफच्या दुप्पट निधी आणि 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने आतापर्यंत 12,000 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. येणार्‍या काळात सुद्धा शेतकर्‍यांना मदत व्हावी, म्हणून सततचा पाऊस हा नवा निकष तयार करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठी मदत मिळणार आहे. शेतकरी सन्मान योजनेत 6000 रुपये केंद्र सरकारचे आणि आता त्यात 6000 रुपये राज्य सरकारची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube