Download App

Lok Sabha : ५ वर्षांचा वनवास खूप झाला, आता पुन्हा नको; पंकजा मुंडेंचं सूचक विधान

  • Written By: Last Updated:

Pankaja Munde : महायुतीच्या राज्यातील लोकसभेच्या (Lok Sabha) जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, नुकतंच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी लोकसभा उमेदवारीचे संकेत दिले होते. लोकसभेत तुम्ही माझी काळजी घ्या, पुढं मी तुमची काळजी घेईल, असं म्हणत त्यांनी उमेदवारीचे संकेत दिले होते. तर आज पुन्हा एकदा त्यांनी ५ वर्षाचा वनवास खूप झाला, आता वनवास नको असं विधान केलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचं हे विधान अतिशय सूचक मानलं जातं.

स्टेट बँकेला मोठा झटका : इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती 24 तासांत जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचे आदेश 

पंकजा मुंडे यांच्या हस्ते शिरूर कासार तालुक्यातील मानूर येथे गोपीनाथ गडाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, एवढे दिवस वनवास भोगला, बापरे, बनवास म्हटलं की, पाचचं वर्षाचा असावा या युगात बाबा! त्या जुन्या काळात होता होता वनवास १४ वर्षाचा. आम्हाला ५ वर्षाचा खूप झाला. का अजून पाहिजे तुम्हाला? मग तुम्ही सगळे आहात ना माझ्यासोबत? या कलियुगातील राजकारणाच्या रनामध्ये माझ्या पाठीमागे तुमचे बळ उभं करा, मला वचन द्या, तुम्ही साथ सोडणार नही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 323 जागांसाठी भरती सुरू, महिन्याला ४४ हजार रुपये पगार 

माझ्या भाग्यात देवानं काय लिहिले आहे ते मला माहीत नाही. आजवर जे काही लिहिलं होतं, ते त्याच्यात तुमच्या प्रेमाव्यतिरिक्त फार काही मिळालं नाही. मी माझ्या आयुष्याबद्दल जास्त बोलत नाही. पण मी खूप दु:ख, यातना आणि वेदना सहन केल्या आहेत. इतकं सगळं भोगूनही मी चेहऱ्यावर हास्य ठेवते, नको असतांनाही चेहरा हसरा ठेवते ते केवळ तुमच्यामुळं.. तुम्ही नाही तर आयुष्यात काही नाही. खड्ड्यात गेलं ते पद-बिद… मला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. पण तुझे प्रेम माझ्यासाठी महत्वाचे आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

त्या म्हणाल्या की, तुम्हाला चांगला विकास देऊन, सन्मार्ग देऊन त्या प्रेमाची पावती मी देणार आहे. त्याची मी परतफेड करणार आहे. तुम्हाला मान खाली घालावी लागले, असं मी कोणतंही कृत्य करणार नाही, असं झालं तर तो माझ्या जीवनातला शेवटचा दिवस असेल, असं पंकजा म्हणाल्या.

माझा कोणीही शत्रू नाही, ते मानत असतील, पण माझ्या मनात काही नाही. एखाद्याला मोठे पद मिळालं तरी मला काही वाटत नाही. कोणतीही आमदारकी, खासदारकी आली की, पंकजा ताईंचं नाव चर्चेत असतं. तुम्ही मोठं केलं म्हणून सारखं टीव्हीवर येतं, अन् नाव नाही आलं की, बाया कडकडं बोटं मोडतात,असं पंकजा म्हणाल्या.

दरम्यान, पंकजा मुंडे यांची बीडमध्ये मोठी ताकद असते. बीडमधील मोठा जनसमुदाय पंकजा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पण तरीही भाजपने पंकजा यांचे राजकीय पुनर्वसन केलेले नाही. मात्र, आता त्या लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. लोकसभा निवडणुकीत भाजप पंकजा मुंडे यांना तिकीट देऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे पंकजा यांना तिकीट मिळणार का? हेच पाहणे महत्त्वाचे आहे.

follow us