Download App

‘बापकमाई ही वाढवायची असते’; बाळा नांदगावकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

  • Written By: Last Updated:

ठाणे : जीवनात दोन प्रकारची कमाई असते. एक असते बापकमाई, आणि दुसरी असते आपकमाई. बापकमाई ही वाढवायची असते. कारण ती वडिलोपार्जित असते. आपकमाई स्व:निर्मित असते. राज ठाकरेंनी (Raj Thackerey) आपकमाई केली, अशा शब्दात मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) चिमटे काढले. नांदगावकर हे मनसेच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ठाण्यातील मेळाव्यात बोलत होते.

यावेळी बोलतांना नांदगावकर यांनी सांगितले की, राज ठाकरेंनी आपकमाई केली. बापकमाई नाही. शिवसेनेतून बाहेर पडतांना त्यांनी सोबत काही घेतलं नव्हतं. आणि त्यानंतर त्यांनी मनसे हा पक्ष काढला. शिवसेनेत असतांना राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरे, राज ठाकरे यांनी पक्षासाठी खूप काही केलं. शेवटी पदरात काय मिळालं हे तुम्ही जाणताच.

राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडायला बरीच कारण आहेत. त्यांनी पक्षसाठी सगळं काही केलं, तरीही त्यांची अवहेलना व्हायची. निवडणूका आल्या की राज ठाकरेंना बाहेर काढायचं. निवडणूकीत वापरायचं. आणि पुन्हा आत घालायचं. सन्मान नावाची गोष्टच नाही. शेवटी या अवहेलनेनंतर राज ठाकरेंनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मनसे पक्ष काढला, आता आपली जबाददारी आहे की, हा पक्ष पुढ न्यायचा. आपली भीती विरोधकांना वाटायला हवी, समाजाला नाही. आपला ध्यास आणि श्वास मराठी माणूस आहे, असं नांदगावकर म्हणाले.

यावेळी नांदगावर यांनी इम्तियाज जलील यांचाही चांगलाच समाचार घेतला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जलील यांनी टीका केली होती. कोण आहेत बाळासाहेब ठाकरे? भारतातील काही मोजके लोक असे आहेत, ज्यांच्यावर निवडणूक आयोगाने बंदी आणली होती. हे महोदय त्यातलेच एक, अशी टीका जलील यांनी केली. दरम्यान, यावर बोलतांना नांदगावर म्हणाले, संभाजी नगरमधील तो तिनपाट छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करत होता. त्याला मी एवढचं सागेल, तुझ्या औरंजेबाला या लाल, काळ्या आणि तांबड्या मातीने गाडलेलं आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, असं ठणकावलं. हा तिनपाट कोण बाळासाहेब ठाकरे असं विचारतो? मी त्याला एवढचं सांगेल, तुझ्या हैदराबादच्या चोरांना विचार, कोण बाळासाहेब ठाकरे कोण… ते बोलताील अब्बाजान अब्बाजान, अशा शब्दात नांदगावकर यांनी जलील यांच्यावर निशाणाा साधला.

गडाखांच्या ताब्यातला नेवासा दूध संघ अखेर बंद करण्याचा निर्णय; दूध उत्पादक आणि कामगारांचा प्रश्न ऐरणीवर

यावेळी नांदगावकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. बाळासाहेबांचा वारसा असूनही, फक्त मतांच्या लाचारीसाठी उद्धव ठाकरे काही बोलत नाहीत, असं ते म्हणाले.

Tags

follow us

वेब स्टोरीज