गडाखांच्या ताब्यातला नेवासा दूध संघ अखेर बंद करण्याचा निर्णय; दूध उत्पादक आणि कामगारांचा प्रश्न ऐरणीवर

गडाखांच्या ताब्यातला नेवासा दूध संघ अखेर बंद करण्याचा निर्णय; दूध उत्पादक आणि  कामगारांचा प्रश्न ऐरणीवर

अहमदनगर : नेवासा तालुका दूध (Nevasa Taluk Milk) संघावर राजकीय हेतूने सुरू असलेल्या एका मागोमाग होत असलेल्या कारवायांमुळे अखेर हा दूध संघ बंद करण्याचा निर्णय दूध संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. हा दूध संघ माजी मंत्री शंकरराव गडाख (Former minister Shankarao Gadakh) यांच्या ताब्यात होता. मात्र, आता हा दूध संघ नाईलाजानं बंद करण्यात येत असल्यानं नेवासा तालुक्यातील हजारो दुध उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकरी आणि दूध संघात काम करणारे कामगार यांचा प्रश्न ऐरणावर आला आहे.

गडाख यांच्या ताब्यात असलेला या दूध संघावर काही वर्षापूर्वी वीज चोरी केल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी दूध संघाच्या अठरा संचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, दूध संघाची वीज तोडू नये, असा न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही वीज कट करण्यात आल्यानं शंकरराव गडाख यांना धक्का बसल्याचं बोलल्या जातं आहे. जेव्हा नेवासा तालुक्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध कुठं घालायचं, असा प्रश्न होता. तेव्हा, शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली या दूध संघाची स्थापना झाली होती. आपलं राजकीय ताकद वापरून गडाखांनी या दूध संघाला परवानगी मिळवली होती. या दूध संघाच्या माध्यमातून नेवासा तालुक्यातील सुमारे ७२ गावामध्ये दूध थंड करण्यासाठी चिलिंग मशीन अनुदान देऊन वाटप करण्यात आले होते. व शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळण्यास यामुळे मदत झाली होती. अर्थकारणाला गती मिळाली होती. तसेच घोडेगाव येथे जनावरांच्या बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना पशुपालनास प्रोत्साहन देणारे व मार्गदर्शन करणारे विविध शिबिरे राबवून संघाच्या मार्फत शेतकऱ्यांना मोठी मदत करण्यात आली होती.

नेवासा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पद देण्याचं काम या दूध संघाने केलं. महानंद, आरे तसेच गुजरातमधील अमूल या दूध संघांशी करार करून दूध उत्पादकांना वाढीव पैसे मिळवून दिले. तीरमली, डवरी गोसावी, वाघवाले या हातावर पोट असलेल्यांना व अल्पभूधारक शेतकरी यांना दूध संघामार्फत बिगर व्याजी ४ ते ६ कोटी रुपये देऊन गाई, म्हशी खरेदी करण्यास अॅडव्हान्स वाटप करण्यात आले होते. नेवासा तालुक्यातील आर्थिक प्रगतीत या दूध संघाचे मोठे योगदान आहे. दरम्यान, आता हा दूध संघ बंद करण्यात येत आहे. हक्काचा दूध संघ बंद होणार असल्याने दूध उत्पादक व कामगार यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ५० कर्माचारी बेरोजगार होणार असून त्यांच्या उपजिविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दररोज २० ते २५ हजार लिटर दूध आता कुठे घालाययचे? हा प्रश्न दूध उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे.

दूध संघावर होत असलेल्या कारवायांबद्दल बोलतांना दूध संघाचे अध्यक्ष गणपत चव्हाण यांनी सांगितले की, गडाख यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला संघ बंद करतांना आम्हाला मोठ्या यातना होत आहेत. संघाला गावात दूध संकलन केंद्रामार्फत संकलित होऊन उत्पादकांचे पाठविण्यात येणारे दूध यांची व्यवस्था करून देण्यासाठी संघाचे कर्मचारी यांना पुन्हा इतरत्र सेवेत येऊन त्यांच्या उपजिवकेचा प्रश्न सोडवण्यासाठी आ. गडाख संकट काळातही प्रयत्नशील असल्याचं चव्हाण यांनी सांगिलते.

Maharashtra Budget 2023 : त्यांनी स्वतःच खाल्लं, दुसऱ्यांना उपाशी ठेवलं; अर्थसंकल्पाआडून मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार

दरम्यान, आ. गडाख हे चक्रव्यूहात अडकले असल्याचे दिसून येत असून संघ बंद करण्याचा निर्णय झाला. तर आता मुळ एज्युकेश सोसायटीची तक्रार शासनाकडे चालू आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे. विरोधकांना लावलेले हे चक्रव्यूह आता गडाख कसे भेदणार, हेच पाहणं महत्वाचं आहे. अन्यथा आगामी काळात गडाखांचं राजकीय वजन कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube