सत्यजीत तांबेंना उमेदवारी न देण्याच पटोलेंनी सांगितले कारण..

मुंबई : नाशिक मतदारसंघात तांबे पितापुत्रांच्या बंडखोरीनंतर महाविकासआघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मविआच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. नाना पटोले म्हणाले, ‘जो काही निर्णय द्यायचा तो हायकमांड देईल. आमचे जे निर्णय झाले आहेत त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली आहे. नागपूरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे आणि नाशिकमध्ये […]

Untitled Design Bm

Untitled Design Bm

मुंबई : नाशिक मतदारसंघात तांबे पितापुत्रांच्या बंडखोरीनंतर महाविकासआघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मविआच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे.

नाना पटोले म्हणाले, ‘जो काही निर्णय द्यायचा तो हायकमांड देईल. आमचे जे निर्णय झाले आहेत त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली आहे. नागपूरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे आणि नाशिकमध्ये आम्ही महाविकासआघाडी म्हणून शुभांगी पाटील आमच्या उमेदवार आहेत.

‘महाराष्ट्रातील पाचही जागी महाविकासआघाडी जिंकेल अशी स्थिती आहे. बेईमानी करून दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा पदवीधरांच्या, शिक्षकांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये लोक भाजपाला त्यांची जागा दाखवतील,’ असं नाना पटोले यांनी म्हटलं.

‘पैशांच्या भरवशावर, सत्तेच्या जोरावर घरं फोडण्याचं पाप भाजपाने केलं. त्याचे परिणाम भाजपाला भोगावे लागतील,’ असा इशाराही नाना पटोलेंनी भाजपाला दिला.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने एबी फॉर्म दिला असना देखील डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तेथे अपक्ष म्हणून त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अर्ज भरला. भाजपाने या निवडणुकीत उमेदवार दिलेला नाही.

इकडे सत्यजीत तांबे अपक्ष नामांकन दाखल करतात आणि भाजपाचा पाठिंबा मागतात. याचा अर्थ हे सर्व आधी ठरलेले होते. हा धोका पक्ष विसरणार नाही आणि ही निवडणूक काही सामान्य निवडणूक नाही.

या निवडणुकीत पदवीधर लोक मतदार आहेत आणि ते काही मूर्ख नाहीत. त्यांनाही कळते की दगाफटका करणाऱ्यांसोबत यशस्वी होणार नाही,’ अशी टीका नाना पटोलेंनी केली होती.

Exit mobile version