पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण : पारसमल जैनचे तीन जबाब सीबीआय फसली अन् पद्मसिंह पाटील सुटले!

Pavanraje Nimbalkar Murder Case मध्ये निर्णायक ठरले आहेत ते पारसमल जैनचे तीन जबाब ज्यामुळे सीबीआय फसली अन् पद्मसिंह पाटील सुटले!

Pavanraje Nimbalkar Murder Case

Pavanraje Nimbalkar Murder Case

Pavanraje Nimbalkar Murder Case Parasmal Jain’s Three Statements to CBI Padamsinh Patil Acquitted : पवनराजे निंबाळकर यांच्या 20 वर्षांपूर्वी झालेल्या हत्या प्रकरणात न्यायालयाने पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल विद्यामान खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का मानला जात आहे. मात्र या प्रकरणामध्ये निर्णायक ठरले आहेत ते पारसमल जैनचे तीन जबाब ज्यामुळे सीबीआय फसली अन् पद्मसिंह पाटील सुटले!

पारसमल जैनचे तीन जबाब सीबीआय फसली…

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाशी संबंधित खटल्याची सुनावणी मुंबईतील विशेष न्यायालयात पार पडली. या प्रकरणातील तपास आणि साक्षीपुराव्यांबाबत न्यायालयाने अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. विशेषतः माफीचा साक्षीदार ठरलेल्या व्यक्तीच्या जबाबांमध्ये आढळलेल्या विसंगतींमुळे संपूर्ण प्रकरणाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.

NEET फेरपरीक्षेत NTAचा अजब घोळ; नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट अबूधाबीचे परीक्षा केंद्र, रोहित पवारांचा संताप

खटल्यादरम्यान सादर झालेल्या माहितीनुसार, 2002 नंतर पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांच्यातील राजकीय मतभेद तीव्र झाले होते. दोन्ही नेते निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. त्यानंतर राजकीय संघर्ष अधिक वाढल्याचे माफीच्या साक्षीदाराने आपल्या जबाबात म्हटले होते.

घोर कलियुग आहे, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाऊ, खा. ओमराजेंनी भूमिका केली स्पष्ट

न्यायालयाने या प्रकरणात एकूण 127 साक्षीदारांच्या साक्षींचा विचार केला. 2003 मध्ये पवनराजे निंबाळकर यांनी आपल्या सुरक्षेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली तक्रारही सुनावणीदरम्यान चर्चेचा विषय ठरली. मात्र तपास प्रक्रियेत काही महत्त्वाच्या बाबींची पडताळणी करण्यात त्रुटी राहिल्याचे न्यायालयाने नमूद केले.

छायाचित्रणातील जादूगार रघु राय आणि मृदंगम सम्राट पालघाट रघु यांच्या कलाप्रवासाचा MIFF मध्ये गौरव

माफीच्या साक्षीदाराच्या कबुलीजबाबाबाबतही न्यायालयाने गंभीर शंका व्यक्त केली. त्याच्या वेगवेगळ्या जबाबांमध्ये मोठे विरोधाभास आढळल्याचे सांगत न्यायालयाने त्याच्या साक्षीची विश्वासार्हता कमी झाल्याचे स्पष्ट केले. तपासादरम्यान प्रक्रियेचे काटेकोर पालन झाले नसल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आले.

सुपरस्टार अल्लू अर्जुनचा हृदयस्पर्शी अंदाज; चिमुकल्या चाहतीसाठी पुन्हा म्हटला ‘झुकेगा नही साला’

याशिवाय, सीबीआयने आरोपपत्रात समाविष्ट केलेल्या काही दस्तऐवजांच्या उगमाबाबत पुरेशी चौकशी केल्याचे दिसून येत नसल्याचे न्यायालयाने म्हटले. त्यामुळे तपासातील काही बाबींवर समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नसल्याचेही नमूद करण्यात आले.एकूणच, ज्यांच्या साक्षीवर खटल्याचा मोठा भाग आधारित होता, त्या माफीच्या साक्षीदाराच्या जबाबांबाबत न्यायालयाने गंभीर आक्षेप नोंदवत त्याच्या साक्षीला अपेक्षित विश्वासार्हता नसल्याचे मत व्यक्त केले.

नेमकं प्रकरणं काय?

हे प्रकरण 3 जून 2006 रोजी घडलेल्या हल्ल्याशी संबंधित आहे. पवनराजे निंबाळकर मुंबईहून धाराशिवकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्यासह चालक समद काझी यांचा मृत्यू झाला होता.

या हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला होता. तपासादरम्यान राजकीय वैमनस्यातून हा कट रचण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणेकडून करण्यात आला. प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी काहींवर हत्येचा कट रचणे, तर काहींवर प्रत्यक्ष हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. दीर्घकाळ चाललेल्या या खटल्याचा निकाल काय लागतो, आरोपींना शिक्षा होते की त्यांची निर्दोष मुक्तता होते, याकडे राज्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version