Download App

Ashok Chavan : पवारांनी निवृत्तीची घोषणा करणं हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय

Pawar’s announcement of retirement is an internal matter of NCP : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. मुंबईत लोक माझे सांगाती या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलतांना त्यांनी याबाबतची घोषणा केली. कुठंतरी थांबण गरजेचं आहे, मी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पुढील अध्यक्ष कोण याबाबतचा निर्णय घ्यावा. तसंच सध्याची राज्यसभेची टर्म संपल्यानंतर पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही. आता नवी जबाबदारी नको, असं म्हणत त्यांनी पक्षाच्या आणि संसदीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, त्यांच्या या निर्णयानंतर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Congress leader Ashok Chavan) यांनी हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय असल्याचं सांगितलं.

अशोक चव्हाण यांनी बोलतांना सांगितले की, शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करणं हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे. पण पवारांसारख्या एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याने राजाीनामा देणं ही खटकणारी बाब आहे. सत्ताधारी भाजपच्या विरोधात राज्यात आणि देशपातळीवर मोट बांधण्यात पवारांचा मोठं योगदान आहे. महाविकास आघाडी स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. भाजपच्या विरोधात विरोधकांना एकत्र करणाऱ्या पवारसाहेबांनी निवृत्तीचा निर्णय घ्यायला नको होता, असं सांगितलं.

Sharad Pawar Retirement : अजितदादांचा वेगळा सूर; अनिल देशमुखांनी बोलणंच टाळलं

महाविकास आघाडीस आघाडीवर पवारांच्या निवृत्तीचा परिणाम होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला असतांना चव्हाण यांनी सांगितले की, नाही… पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाचा फार परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही. कारण, नेतृत्व हे कायम बदलत राहतं… पण, एका अनुभवी नेता कमी झाल्यानं त्यांची उणीव भासेल.. त्यामुळं
पक्षाच्या नव्या समितीने पवारांच्या निर्णयाविषयी त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय मागे घ्यायला भागं पाडावं, असं ते म्हणाले.

गेल्या 60 वर्षांपासून देशाच्या राजकारणात शरद पवार नावाचं घोंघावणारं वादळ आता संसदीय राजकारणात दिसणार नाही. योग्य वेळी भाकरी फिरवावी लागते, ती नाही फिरवली तर ती करपते, असं सुचकपणे शरद पवार म्हणाले होते. आज त्यांनी भाकरी फिरवण्याची सुरूवात स्वत:पासून केली. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त असल्याचं सांगत पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही, अशी घोषणा केली. पवारांच्या या निर्णयाला कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला.

 

Tags

follow us