Download App

लोक बेघर होत आहे, त्याला विकास म्हणता येणार नाही, राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Raj Thackeray : महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेबरोबरच मराठी माणसाचं अस्तित्व देखील टिकवलं पाहिजे. अशी टीका मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे

  • Written By: Last Updated:

Raj Thackeray : महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेबरोबरच मराठी माणसाचं अस्तित्व देखील टिकवलं पाहिजे. अशी टीका मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील विश्व मराठी साहित्य संमेलनात (Vishwa Marathi Sahitya Sammelan) बोलताना केली.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आज मराठी माणसांचे अस्तित्व शहरात असावे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. आज जर आमची लोक  राज्यात बेघर होत असेल तर त्याला विकास म्हणता येणार नाही. अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी राज्य सरकारवर केली. तसेच भारतीय असून सुद्धा देखील तुम्हाला हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) जमीन विकत घेता येत नाही. पण महाराष्ट्रात तुम्ही या आणि आमची जमीन घेऊन जा अशी परिस्थिती आहे. तुमचे अस्तित्व टिकले नाही भाषा कधी टिकेल.असं देखील राज ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मराठी माणसाने अस्तित्व टिकवले पाहिजे. पुस्तकं नवीन मुलांनी वाचवली पाहिजेत. साहित्यिकांनी विनंती आहे, तुम्ही मार्ग दाखवायला पाहिजे. साहित्यिक राजकीय मत मांडायचे पण आता ते मला दिसत नाही. असेही राज ठाकरे म्हणाले.

तसेच काश्मीरमध्ये 370 कलम रद्द करण्यात आला मात्र त्याचा अर्थ काय? 370 रद्द झाल्याने आता भारतीय माणूस तिथे जमीन घेऊ शकतो. खरं तर पहिल्यांदा अदानी आणि अंबीनींनी तिकडे जमीन घ्यायला हव्या. म्हणजे लोकांना विश्वास बसेल. फक्त काश्मीर नाही तर हिमाचल प्रदेशमध्ये, आसाम आणि मणिपूरमध्ये देखील भारतीय असून तुम्ही जमीन खरेदी करू शकत नाही. त्यामुळे आम्हीच का मोकळीक दिलीये?, महाराष्ट्रात जमीन विकल्या जातात.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ; शिवराज राक्षेचा गोंधळ, पंचाला लाथ मारली..

आमच्याकडे जमीन घ्या, आपल्याकडेच सुरु आहे. तुमचं अस्तित्व टिकलं नाही, भाषा कोठून टिकेल. तुम्ही असाल तर भाषा टिकेल. असं देखील यावेळी राज ठाकरे म्हणाले.

follow us