आरआरएसचा आहेस तर इकडे कशाला? राज ठाकरेंनी खडसावलं? पिट्याभाई म्हणाला, ते आमचे कान ओढू…

Raj Thackeray यांनी अभिनेता रमेश परदेशींना झापलं मात्र यानंतर त्यांनी असं काही घडलंच नसल्याचे मनोगत व्यक्त करत सारवासारव केली आहे.

Raj Thackeray

Raj Thackeray

Pitya Bahi reaction on Raj Thackeray angry on him in meeting : राज्यामध्ये सध्या सर्व राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाला कंबर कसून लागले आहेत. त्यात विविद सभा बैठकांच सत्र सुरू आहे. त्यात राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. यामध्ये त्यांनी मुळशी पॅटर्नफेम अभिनेता रमेश परदेशी ज्यांना पिट्याभाई म्हणूनही ओळखलं जातं. त्याला चांगलंच झापल्याचं पाहायला मिळालं. मात्र यानंतर त्यांनी असं काही घडलंच नसल्याचे मनोगत व्यक्त करत सारवासारव केली आहे.

https://x.com/brizpatil/status/1986369090336981167?t=UOsV7Q_LBb19LF8JAtxeNQ&s=08

काय म्हणाले राज ठाकरे

गेल्या काही दिवसांपूर्वी Rss च्या संचलनात गणवेशातील फोटो रमेश परदेशी उर्फ मुळशी पॅटर्ममधील पिट्याभाई यांनी टाकले होते. त्यावर राज ठाकरे यांनी ‘कुठे तरी एका ठिकाणी राहा, Rss चा कार्यकर्ता आहेस. तर इकडे कशाला आला? असं म्हणत राज ठाकरेंनी बैठकीत पिट्याभाईला खडसावले. तसेच ते म्हणाले की, छातीठोकपणे सांगतोस ना की, मी संघाचा कार्यकर्ता आहे. मग कशाला टाईमपास करतोस.

काय म्हणाले रमेश परदेशी?

राज ठाकरे यांनी खडसावल्यानंतर याबाबत रमेश परदेशी म्हणजेच पिट्याभाईला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने असं काहीही घडलं नसल्याचा म्हटलं. तसेच राज ठाकरे हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत. ते आमचे कान ओढू शकतात. मी मनसेचा कार्यकर्ता आहे, पण मी लहानपणापासून आरएसएसमध्ये काम करतो असं हे स्पष्टीकरण यावर पिट्याभाई यांनी दिलं आहे.

 

Exit mobile version