Zila Parishad Election Results : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा (Zila Parishad Election Results) निकाल समोर आला. कोणाची सुन, मुलगा, कोणाचा भाऊ तर कोणाचा पुतण्या निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. आता या निवडणुकीतला एक ट्विस्ट म्हणजे एका दिग्गज नेत्याने तब्बल 5 नातेवाईकांना वेगवेगळ्या पक्षातून रिंगणात उतरवलं. नेमके कोणत्या नेत्याचे कोण उमेदवार रिंगणात होते, त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात…
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन धक्के बसले आहेत. जयकुमार यांचे बंधू अरुण गोरे यांचा माण तालुक्यातील कुकुडवाड गटात पराभव झाला, येथे राष्ट्रवादीचे अनिल देसाई विजयी झाले आहेत. तर औंध गटात देखील मंत्री जयकुमार गोरे यांच्या भावजय भारती गोरे यांचा 40 मतांनी पराभव झाला, येथे राष्ट्रवादीच्या मनिषा फडतरे विजयी झाल्या आहेत.
मोठी बातमी! ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत बिघडली, पुण्याला रुग्णालयात हलवलं
भाजप नेते तथा माजी आमदार त्र्यंबक भिसे यांना हा मोठा धक्का बसला असून लातूर जिल्ह्यातील कामखेडा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या आशाताई भिसे यांचा विजय झाला आहे. भाजपाच्या सरिता भिसे यांचा पराभव झाला असून सरिता भिसे माजी आमदार त्रिंबक भिसे यांच्या भावजय आहेत. लातूर जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या कन्येला पराभव पत्कारावा लागला आहे. रोहिना जिल्हा परिषद गटातून सुप्रिया शृंगारे पायाळ यांचा पराभव झाला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा कांबळे यांचा विजय झाला आहे.
सुरेश वरपूडकर यांची कन्या सोनल देशमुख या झरी जिल्हा परिषद गटातून मशालीच्या चिन्हावर उभ्या होत्या. मात्र, सोनल वरपूडकर यांना पराभव पत्कारावा लागला आहे, भाजपचे उमेदवार दिलीप देशमुख यांनी त्यांचा पराभव केलाय. दुसरीकडे त्यांचे चिरंजीव समशेर वरपूडकर हे शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून उभे होते त्या ठिकाणी मशाल या चिन्हावर उभे असलेले पांडुरंग खिल्लारे यांनी समशेर वरपूडकर यांचा पराभव केला. दुसरीकडे त्यांच्या सुनबाई प्रेरणा वरपूडकर या दैठणा जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी उभ्या होत्या, त्या ठिकाणीही काँग्रेसच्या ज्योत्स्ना गणेश घाडगे यांनी त्यांचा पराभव केलाय. त्यामुळे वरपूडकर यांचे घरातील तीनही उमेदवार पराभूत झाले आहेत.
कोण सुखी होणार, कोणाला काळजी घ्यावी लागेल! जाणून घ्या सोमवारी तुमचे तारे काय म्हणतात!
मोहोळमध्ये कुरुल जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील स्वतः उमेदवार असून ते पराभूत झाले आहेत. तर, नरखेड जिल्हा परिषद गटातून उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील यांचा पराभव झाला आहे.
विजयी नातेवाईक…
सांगली जिल्ह्यात रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांच्या सूनबाई मोहिनी खोत बागणी जिल्हा परिषदेतून विजयी झाल्या आहेत. तर, आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल आमेर अंभई गटातून जवळपास 3435 हजार मतांनी विजयी झाले आहेत. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर विजयी झाल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांचा 980 मतांनी पराभव झाला. माधवी पडळकर या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती राहिलेले ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव जिल्हापरिषद गटातून भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी विजयी झाल्या आहेत. तर, चपळगाव पंचायत गणातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू सागर कल्याणशेट्टी विजयी झाले आहेत. तोळनूर पंचायत गणातून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कन्या शीतल सिद्धाराम म्हेत्रे विजयी झाल्या आहेत. सलगर जिल्हा परिषद गटातून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा मुलगा शिवराज सिद्धाराम म्हेत्रे हे विजयी झाले आहेत.
भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात अटक वॉरंट जारी
उत्तर सोलापूरच्या कोंडी जिल्हा परिषद गटातून माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र डॉ.पृथ्वीराज दिलीप माने विजयी झाले आहेत. दक्षिण सोलापूरच्या हत्तूर जिल्हा परिषद गटातून माजी आमदार रतिकांत पाटील यांच्या पत्नी लक्ष्मी रतिकांत पाटील विजयी झाल्या आहेत. धाराशिव जिल्ह्याच्या परंड्यातील शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी विजयी झाली आहे. आलूर पंचायत समिती गणातून 3925 मतांनी आकांक्षा चौगुले यांचा विजय झाला.
