Ambadas Danve : कर्नाटक सरकारने आधीच्या भाजप सरकारने केलेला धर्मांतरण विरोधी कायदा रद्द केला तसेच सावरकर, हेडगेवार यांच्यावरील धडे अभ्यासक्रमातून काढून टाकले. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार तो हाच कर्नाटक पॅटर्न आहे का, असा सवाल करत महाविकास आघाडी विशेषतः उद्धव ठाकरेंची कोंडी केली होती. यावर आता ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
तुमची महाशक्ती आणि पातशाह सावरकरांना भारतरत्न कधी देणार असा सवाल दानवे यांनी फडणवीस यांना विचारला आहे.दानवे यांनी ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
देवेंद्रजी आम्हाला कसला पॅटर्न विचारता? देशभरातील अर्धा डझन राज्यांचे सरकारं मागच्या दाराने पाडण्याचा पॅटर्न तुमच्याच पक्षाने आणला आहे. सावरकरांच्या नावाचा वापर ताटातील मिठासारखा करणे बंद करा आता. एवढेच सावरकर प्रेम असेल तर तुमची महाशक्ती आणि पातशाह सावरकरांना भारतरत्न कधी देणार…
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 17, 2023
दानवे यांनी ट्विटमध्ये म्हटले, की देवेंद्रजी आम्हाला कसला पॅटर्न विचारता? देशभरातील अर्धा डझन राज्यांचे सरकार मागच्या दाराने पाडण्याचा पॅटर्न तुमच्याच पक्षाने आणला आहे. सावरकरांच्या नावाचा वापर ताटातील मिठासारखा करणे बंद करा आता. एवढेच सावरकर प्रेम असेल तर तुमची महाशक्ती आणि पातशाह सावरकरांना भारतरत्न कधी देणार आहेत, हे पण सांगून टाका. असे ट्विट त्यांनी केले आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेवर येताच दोन मोठे निर्णय घेतले. हे निर्णय मागील भाजप सरकारने घेतले होते. यानंतर आणखीही काही निर्णय रद्द करण्याच्या तयारी काँग्रेस सरकार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या या निर्णयांचा भाजपकडून विरोध केला जात आहे. मात्र त्याने काही फरक पडलेला नाही.