Download App

Karnataka Election Results: ‘बजरंग बलीची गदा भाजपच्या डोक्यावर पडली’, संजय राऊतांचा हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Karnataka Election Results: कर्नाटकमध्ये आज मतमोजणीला वेग आला आहे. सुरुवातीलाच कलांनुसार काँग्रेस आघाडीवर आहे. येत्या काही तासामध्येच निकाल स्पष्ट होणार आहे. यामुळे काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करू शकणार आहे, असा विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेसच सत्ता स्थापन करणार असल्याचा मोठा दावा केला आहे.

संजय राऊत हे  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटकच्या जनतेने मोदी-शाहांना झिडकारलं आहे, हे मान्य करा. अनेक ठिकाणी महाराष्ट्रातील भाजपा नेते गेले होते. ते जिथे जिथे गेले आहेत, तिथे तिथे भाजपाचा (BJP) मोठा पराभव झाला. महाराष्ट्रातून भाजपा नेत्यांची मोठी टोळी काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कर्नाटकात गेली होती.

Karnataka Election : काँग्रेसमुक्त भारत म्हणून चिडवायचे, आता भाजपामुक्त दक्षिण भारत झाला : खर्गे

त्या प्रत्येक ठिकाणी भाजपाचा दारूण पराभव झाला. तसेच बजरंग बलीची गदा भाजपच्या डोक्यावर पडली, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी यावेळी केला आहे. कर्नाटकातील निकाल २०२४ साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा असेल. २०२४ मध्ये असाच निकाल लागेल. ही एक लोकभावना आहे. देशाची मन की बात कर्नाटकातून बाहेर पडली.

Tags

follow us