Prajakt Tanpure on ed case : राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास थांबवून क्लोजर रिपोर्ट न्यायालयाला दिला आहे. न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. परंतु ईडीकडे (ED) मात्र हे प्रकरण सुरू आहे. यात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांचेही नाव आहे. त्यामुळेच राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. त्याचप्रकरणात मंगळवारी तनपुरे मुंबईत गेले होते. परंतु ईडीचा आणि उमेदवारी माघार घेण्याचा संबंध नसल्याचे तनपुरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी याबाबत लेट्सअपशी संवाद साधला.
प्राजक्त तनपुरे म्हणाले, ईडीचे प्रकरण चालू आहे. त्याची आज तारीख होती. राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणात महाराष्ट्रच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यामधील सी समरी न्यायालयाने स्वीकारली आहे. त्यामुळे मूळ फिर्याद राहिलेली नाही. आम्ही सर्वांनी ईडीबाबत कोर्टामध्ये डिस्चार्ज अॅप्लिकेशन दाखल केले आहे. मूळ गुन्ह्याच राहिलेला नाही. त्यामुळे ईडीला तपासाबाबत अधिकार नाही, सुप्रीम कोर्टाचे तसे जजमेंट आहेत. वर्षभरापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने क्लीनचिट दिलेली आहे. दोन महिन्यापूर्वी न्यायालयाने सी समरी स्वीकारलेली आहे.
जवळपास एक-दीड महिन्यापासून ईडीचे वकील पुढची तारीख घेत होते. आमच्या वकिलांनी आमची बाजू मांडली. मूळ गुन्हाच नाही. ईडीच्या वकिलांनी 13 एप्रिल ही तारीख घेतली आहे. पुढच्या तारखेला हा विषय संपून जाईल. मूळ गुन्हा नसेल तर ईडीच्या तपासाचा संबंध येत नाही. त्यामुळे न्याय देवतेवर माजा विश्वास आहे, असे तनपुरे म्हणाले.
निवडणुकीतून माघार आणि ईडीचा संबंध नाही. कारण वर्षभरापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने क्लिनचिट दिलेली आहे. तर न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारलेला आहे. त्यामुळे दोन्ही घटनेचा संबंध जोडून, लोकांची दिशाभूलही करू नये, असे तनपुरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
