Download App

राहुल गांधींची अवस्था वाघ नव्हे माजंरासारखी, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) राहुल गांधींची अवस्था मांजरासारखी केलीय, अशी टीका आंबेडकरांनी केली.

  • Written By: Last Updated:

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि भाजप (BJP) सरकारवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) राहुल गांधींची अवस्था मांजरासारखी केलीय, अशी टीका आंबेडकरांनी केली. तसेच काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, भाजप आणि आरएसएस हे आरक्षण विरोधी आहेत, असंही आंबेडकर म्हणाले. बुधवारी नांदेड शहरातील सिडको येथे रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले.

फिक्स्ड डिपॉझिट ते एलपीजी गॅस…1 मार्चपासून ‘हे’ मोठे बदल होणार, परिणाम थेट खिश्यावर 

यावेळी आंबेडकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई यांनी आरक्षणाबाबत एक निर्णय दिला आहे. ज्यांना आरक्षण मिळाले आहे, योजनेचा लाभ मिळाला आहे, त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही असा हा निर्णय आहे. न्यायाधीशांच्या या निर्णयाची अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने समितीही स्थापन केली. मागच्या पाच वर्षापासून सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आरक्षणाचा हा खेळ सुरू आहे. ज्या दिवशी अंतिम निकाल लागेल, तेव्हा राजकीय आणि नोकरीतील आरक्षण ओबीसीचे निघून गेलेले असेल, असं देखील आंबेडकर म्हणाले.

विधिमंडळ रुग्णालय समितीचे अध्यक्षपद डावललं; मस्साजोग प्रकरणात हात धुऊन मागे लागलेले धस पुन्हा ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत 

यावेळी आंबेडकरांनी राहुल गांधींवरही टीका केली. ते म्हणाले, राहुल गांधींची मांजरासारखी अवस्था नरेंद्र मोदींनी केली आहे. मोदींनी सरळ सांगितले, तोंड उघडलं तर तिहारं जेलमध्ये टाकले. त्यामुळं राहुल गांधी स्वतःसाठी लढेल की, तुमच्यासाठी लढेल? असा सवाल करत इथं माणसांना राहुल गांधी यांनी वाऱ्यावर सोडलं, असं आंबेडकर म्हणाले. आपले डोके आपल्या खांद्यावर राहिले पाहिजे. आपली मान दुसऱ्याच्या खांद्यावर असता कामा नये. कधी सूरी फिरले, हे कळणार नाही, असंही आंबेडकर म्हणाले.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप संविधान विरोधी
देशात दोन्ही बाजूंनी संकट आहे, एकीकडे व्यवस्थेने दिलेली सुरक्षितता, आरक्षण काढण्याचा भाग सुरू आहे आणि दुसरीकडे राज्यात आणि केंद्रात सत्तेत बसलेले नेते संविधान बदलण्याची भाषा करत आहे. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, भाजप आणि आरएसएस हे सगळेच आरक्षण विरोधी आहेत, अशी टीकाही आंबेडकरांनी केली.

फुले-शाहू-आंबेडकरी जनतेची मशाल मिन-मिनत्या दिव्या साऱख्या झाल्याचं दिसत आहे, ज्या दिवशी ही मशाल पुन्हा पेटलेली दिसेल, तेव्हा संविधान बदलणारे लोक तुमच्याकडे लोंटांगण घालतील, असं आंबेडकर म्हणाले.

पुण्यातील स्वारगेटच्या घटनेवर आंबेडकर म्हणाले की, बस डेपोत तरुणीवर झालेला अत्याचार ही अत्यंत गंभीर घटना आहे. राज्याचे मुख्यमंत्री बदलले पण, परिस्थिती तशीच आहे, अशा घटना केवळ स्वारगेटमध्येच नव्हे तर अनेक ठिकाणी घडल्या आहेत. फक्त बसस्थानकच नाही तर कुठलाही परिसर महिलांसाठी सुरक्षित नाही. महिला ही उपभोगाची वस्तू असल्याचं भाजप-आरएसएसचे तत्वज्ञान सांगतंय. त्यातून अशी विकृत मानसिकता विकसित होणारच, असं म्हणत महिला सुरक्षिततेच्या बाबतीत सरकारने ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, असं आंबेडकर म्हणाले.

follow us