Download App

Nana Patole : ठाकरे-आंबेडकर युतीचे स्वागत… तरीही

पुणे ः वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात आज युतीची घाेषणा करण्यात आली. दाेघांनाही आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा प्रस्ताव समजल्यानंतरच काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) व्यक्त केले.

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा निवडणुका संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात बैठक घेतली. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित हाेते. त्यानंतर पटाेले पत्रकारांशी बाेलत हाेते. पटाेले म्हणाले की, आज आंबेडकर-ठाकरे यांची झालेली संयुक्त पत्रकार परिषद हा महाविकास आघाडीचा भाग नव्हती. ती पत्रकार परिषद त्या पक्षातील हाेती.  प्रकाश आंबेडकर यांचा नक्की प्रस्ताव काय आहे. ताे समजल्यानंतरच काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करु.

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा निवडणुका या बिनविराेध करण्यासंदर्भात भाजपकडून जर प्रस्ताव आला तर काय करायचे, याचा विचार करु. मात्र, यापूर्वी झालेल्या पंढरपूर, देगलुर तसेच इतरही निवडणुकावेळी भाजपने आपले उमेदवार दिलेले हाेते. आम्ही त्याचाही विचार करु, असे नाना पटोले म्हणाले.

यावेळी नाना पटाेले यांनी राज्यपाल काेश्यारींवर सडकून टीके केली. पटाेले म्हणाले की, राज्यपाल भवन हे भाजप भवन झालेलं आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात संविधानिक व्यवस्थेचं पालन करणारे तेवढ्याच जबाबदारीचे राज्यपाल असले पाहिजे होते. पण तसं झालं नाही. म्हणून आमचे सातत्याने मागणी हाेती की, राज्यपाल भवन हे भाजप भवन झालेलं आहे. राज्यपाल हे महामहीम राष्ट्रपतींशी निगडीत असतात. त्यांना राजीनामा द्यायचा असता तर त्यांनी आपलं म्हणणं राष्ट्रपतींकडे पाठवायला हवं होतं. मात्र, त्यांनी ताे पंतप्रधान माेदी यांच्याकडे पाठवला आहे.

 

 

 

 

Tags

follow us