Prakash Ambedkar : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याच पक्षातील लीडरशिप संपवली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याच पक्षातील लीडरशिप संपवली पुणे ः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सोबत येतील अशी अपेक्षा आहे. आमचं राष्ट्रवादी काँग्रेससोबत फक्त मुद्द्यांचे भांडण आहे. सध्या देशभर ईडी (ED) च्या माध्यमातून राजकीय नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आले नाहीये. प्रत्येकाला एक दिवस जायचेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

_LetsUpp (4)

PM Narendra Modi_LetsUpp

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याच पक्षातील लीडरशिप संपवली

पुणे ः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सोबत येतील अशी अपेक्षा आहे. आमचं राष्ट्रवादी काँग्रेससोबत फक्त मुद्द्यांचे भांडण आहे. सध्या देशभर ईडी (ED) च्या माध्यमातून राजकीय नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आले नाहीये. प्रत्येकाला एक दिवस जायचेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पक्षातील लीडरशिप संपवली आहे, असा थट हल्ला वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर पंतप्रधान माेंदींवर केला.

 

राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीच्या प्रयाेगाची साेमवारी (दि. 23) घाेषणा करण्यात आली. यावेळी पञकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बाेलत हाेते. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आज वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना असे आम्ही दोघे एकत्र आलो आहोत. या निमित्ताने निवडणुकांमध्ये एक बदलाचं राजकारण सुरू झाले आहे. उपेक्षितांचे, मुद्द्यांचे राजकारण पुन्हा चालू होईल अशी आम्हाला खात्री आहे.

 

हुकूमशाहीविरोधात उभे राहणाऱ्या प्रादेशिक पक्षांना आमचा पाठिंबा असेल. राजकारण नितीमत्तेवर येईल असा आमचा प्रयत्न असेल. शिवसेना ही प्रबोधनकार ठाकरे यांच्या हिंदुत्त्वावर चालत आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. या हुकूमशाहीच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. त्यासाठी आम्ही एकत्र आलाे आहोत, असे देखील प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

 

Exit mobile version