Download App

भाजप-आरएसएस देवाचा वापर ईव्हीएमसारखा करतेय; प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

Prakash Ambedkar on BJP : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राममंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, या सोहळ्यावरून राजकीय वातावरणही तापत आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून भाजपवर टीका केली. भाजप (BJP) देवाचा वापर ईव्हीएमसारखा करत असल्याची टीका त्यांनी केली.

मोठी बातमी! सूरज चव्हाण याला ईडीची कोठडी, कथित खिचडी घोटाळा प्रकरण अंगलट! 

22 तारखेला अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिलं होतं. पण, हा राजकीय सोहळा असल्याचं सांगत त्यांना या कार्क्रममाला जायला नकार दिला होता. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पंथाला देशाच्या वरती स्थान दिलं, त्यांना आपल्या राजकीय फायद्यासाठी या धार्मिक सोहळ्याचे आयोजन केल्याचं आंबडेकर म्हणाले होते. तर आताही पुन्हा एकदा त्यांनी ट्वीट करून भाजपवर निशाणा साधला. भाजप देवाचा वापर ईव्हीएमसारखा करत असल्याचं ते म्हणाले. त्यांनी लिहिलं की, गेल्या 10 वर्षात, भाजप-आरएसएसने अनेक भारतीय चिन्हे आणि वारशांना आपल्याशी जोडलं आह. (जसे की बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, टागोर, भगतसिंग) कारण, भाजप-संघामध्ये यांच्या श्रेणीतलं कोणीही नाही, असं आंबेडकरांनी म्हटलं.

घड्याळाची टिकटिक घराघरात वाजण्यासाठी तयारीला लागा; सुनील तटकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन 

आंबेडकर यांनी पुढं लिहिलं की, आता भाजप-संघ कोणतीही नैतिकता आणि तत्त्वे न ठेता आपल्या निवडणूक फायद्यासाठी आता राम मंदिर उद्घाटनाचा वापरही असाच करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप-रा.स्व. संघ देवाचा वापर ईव्हीएमसारखा करत आहे.लाज बाळगा, असंही आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, इंडिया त आघाडीच्या अनेक प्रमुख नेत्यांनी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, अधीर रंजन चौधरी यांनी उद्घाटनाला उपस्थित राहणार नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. हा भाजपचा राजकीय कार्यक्रम असल्याने ते जाणार नसल्याचे या नेत्यांनी सांगितले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, रालालू प्रसाद यादव, शरद पवार यांनीही उद्घाटनाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिली आहे.

follow us