Download App

राष्ट्रवादीने इतकी वर्ष जनतेला फसवलं; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

Image Credit: Prakash Ambedkar

Prakash Ambedkar On NCP : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar)राष्ट्रवादी कॉंग्रेसवर (NCP)जोरदार निशाणा साधला आहे. आंबेडकर राष्ट्रवादीवर टीका करताना म्हणाले की, राष्ट्रवादी आधी स्वतःला शाहू(Shahu Maharaj), फुले (Jyotiba phule), आंबेडकरवादी (Babasaheb Ambedkar)म्हणवत होता. आता मात्र ते भाजपसोबत (BJP) बसत असतील तर त्यांनी इतकी वर्ष जनतेला फसवलं आहे, असं म्हणात प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली आहे.

Road Accident : बोलेरो-ट्रॅक्टर-ट्रॉलीचा भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादीवर टीका केली आहे. त्यावेळी ते म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकरवादी म्हणवणारा पक्ष आता भाजपसोबत बसत असेल तर राष्ट्रवादीने एवढे वर्ष जनतेला फसवलं आहे.

राष्ट्रवादीचा पूर्वी शाहू, फुले, आंबेडकरवाद्यांचा कलर होता. आता त्यांचा बीजेपी, शिवसेनेचा कलर होतो की काय अशी परिस्थिती राष्ट्रवादीची झाली असल्याची परखड टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

त्याचवेळी पत्रकारांनी बारसु प्रकल्पाबद्दल प्रश्न केला त्यावर आंबेडकर म्हणाले की, बारसूच्या प्रकल्पाला आमचा विरोध आहे. एनरॉलला सुद्धा आमचा विरोधच आहे. एनरॉलला घालवण्यामध्ये आमची भूमिका मोठी होती. आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माझं आवाहन आहे की, कोकणाची वाट लावू नका. यावेळी ते म्हणाले की, केंद्रातून फोन आला की, यांच्या भूमिका बदलतात, त्यामुळे त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असलं पाहिजे.

follow us

वेब स्टोरीज