Prakash Ambedkar on PM Modi : आगामी वर्षात देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) आहेत. ही ऩिवडणुक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी समविचारी पक्षांची मोट बांधली. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा दावा भाजप करत आहे. दरम्यान, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी याबाबत मोठं विधान केलं. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत, असं विधान त्यांनी केलं.
सेटल होणारे मुख्यमंत्री कार्यालयात बसलेत, मातोश्रीवर नाहीत; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
आजच्या दिवशी म्हणजेच 13 ऑक्टोबर 1935 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्यातील मुक्तीभूमी येथे धर्मांतराची घोषणा केली. याच धर्मांतर घोषणेचा 88 व्या वर्धापन दिनाला प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. या कार्यक्रमात पंचशील ध्वजारोहण केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत ही गोष्ट निश्चित आहे. 2024 मध्ये सरकार कुणाचं येईल हे आज सांगता येणार नाही. पण नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत, असं ते म्हणाले.
पुढं बोलतांना त्यांनी सांगितलं की, नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचे असेल तर भाजपला 272 जागा जिंकाव्या लागतील. मात्र, सद्यस्थितीत भाजपला 200 जागा मिळतील का? अशी स्थिती आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं.
मोदींना हिमालयात पाठवा
बीडच्या सभेत बोलतांना आंबेडकरांनी मोदींवर घणाघाती टीका केली होती. ते म्हणाले की, भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येईल आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असा दावा भाजप नेते करत आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी केवळ दोन वर्षांसाठीच पंतप्रधानपदावर राहतील, त्यानंतर ते संन्यासी बनून हिमालयात निघून जातील, असा प्रचार आरएसएस करत आहे.
नरेंद्र मोदींना दोन वर्षांनी हिमालयात कशाला पाठवताय, त्यांना आत्ताच हिमालयता पाठवा. त्यामुळं देशाचं खूप भलं होईल, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली होती. तर आता त्यांनी मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असं वक्तव्य केलं होतं