Prakash Ambedkar News : नैतिकतेच्या गप्पा मारता तर मग अजित पवारांना बरोबर का घेता? असा खडा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजपला केला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या सभांचा धडाका सुरु झाला आहे. अशातच भंडाऱा जिल्ह्यातील साकोलीत आज जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना आंबेडकरांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करीत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
वुमन फिटनेस लीडर ऑफ द इयर पुरस्कार सोहळा: ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने पटकावला
प्रकाश आंबेडकर म्हणाले, भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगेचा प्रकल्प आपल्या डोळ्यासमोर येतो. नागपूर हायकोर्टात या भ्रष्टाचाराबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. अजित पवार यांच्या काळात हा भ्रष्टाचार झाला असून तो अद्याप सिद्ध झालेला नाही. जे लोकं सिंचन घोटाळ्याच्या विरोधात होते, त्यांनी दिल्लीत अण्णा हजारेंना उपोषणाला बसवलं होतं. ज्या अजित पवारांच्या काळात हा घोटाळा झाला त्यांनाच भाजपने आज पक्षात घेतलं असल्याची सडकून टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.
Manoj Jarange Patil: ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर रिलीज
तसेच भाजप आरएसएसने ज्यांना उपोषणाला बसवलं त्याचं पक्षाने ज्या मंत्र्यांच्या काळात घोटाळा झाला त्या अजित पवारांना पक्षात घेतलं आहे. उद्याच्या प्रचारात नूसत्या नैतिकतेच्या गप्पा मारतील. आम्ही नैतिकतेचे मालक आहोत असं ते म्हणतात. तुम्ही नैतिकतेचे मालक आहात तर अजित पवारांना तुमच्या आघाडीत कसं घेतलं. याचा खुलासा करा, असं खुलं आव्हान आंबेडकरांनी भाजपला दिलं आहे.
Pawan Singh Asansol : गौतम गंभीर नंतर ‘या’ गायकाचा भाजपकडून तिकीट मिळूनही निवडणूक लढण्यास नकार
वैनगंगेवरील प्रकल्पातील हा घोटाळा आहे. हा घोटाळा झाला नसता तर नूसती सिंचनाची नाहीतर भंडारा गोंदियात इतही समाजालाही फायदा झाला असता. गोंदिया भंडारा जिल्ह्यात मासेमारी करणारा समाज आहे. घोटाळा नसता झाला तर अर्थिक कायापालट झाली असती. अशा समूहाला शासनाने नवीन जीवनदान दिलं असतं आणि अर्थिक प्रगतीला लावलं असता, पण हे व्यापारी सरकार असून नफा तोटा बघणारं सरकार असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात सध्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, महाविकास आघाडीत अद्याप वंचित बहुजन आघाडीचा समावेश आहे की नाही? याबाबत स्पष्टता नाही. आंबेडकरांचं याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बोलणं सुरु असून दुसरीकडे राज्यभरात सभांचा जोराचा धडाकाच सुरु आहे.