Download App

Kasba – Chinchwad By Poll : आंबेडकरांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला डिवचले, दोन्ही जागा शिवसेनेला…

पुणे : कसबा व चिंचवड पोट निवडणूक साठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. यातच राज्यात नुकतेच भीमशक्ती आणि शिवशक्ती यांची युती झाली आहे. दरम्यान या निवडणुकीवरून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. कसबा – चिंचवड निवडणुकीसाठी वंचित उमेदवार देणार नाही असे आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले आहे.

पत्रकार परिषेदत बोलताना आंबेडकर म्हणाले, आम्ही सेनेला विनंती केली की कसबा व चिंचवड दोन्ही जागा तुम्ही लढा. कसब्याची जागा काँग्रेस गेली अनेक वर्षांपासून पराभूत होत आलेली आहे. आम्हाला या ठिकाणी लढायचे नसल्याने आम्ही शिवसेनेला विनंती केली की तुम्ही या दोन्ही जागा लढा. याबाबत शिवसेना काय भूमिका घेणार हे येत्या काळात स्पष्ट होईल, असे आंबेडकर म्हणाले. याबाबत आम्ही पक्षाच्या वतीने शिवसेनेला कळविले आहे. तसेच याबाबत काय निर्णय घ्यायचा हे सेना ठरविणार आहे.

सुशिक्षितांनी भाजपाकडे पाठ फिरवली
नुकतेच पदवीधर निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत भाजपाला धक्का बसला आहे. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, या निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून सुशिक्षितांनी भाजपाला पाठ दर्शविली आहे. मात्र सामान्य माणसांनी पाठ फिरवली आहे की नाही हे आगामी काळातील सर्वसामान्य निवडणुकामधून स्पष्ट होईल. निवडणुकांचे निकाल म्हणजे भाजपविरोधी ट्रेंड आहे असे आंबेडकर म्हणाले.

महापालिका निवडणुकांबाबत आंबेडकर म्हणाले…
आगामी काळात महापालिका निवडणुका आहेत. यातच राज्यात भीमशक्ती आणि शिवशक्ती यांची युती झाली आहे. यावर आंबेडकर म्हणाले, या निवडणुकांबाबत आमच्या ज्या काही अटी होत्या त्या ठाकरे गटाने मान्य केल्या आहेत. मुंबई सोडून इतर ठिकाणच्या महापालिका आहेत त्या ठिकाणच्या पदधिकाऱ्यांनी आपसात बसून तडजोड केली तर चांगली राहील असे आंबेडकर म्हणाले आहे.

Tags

follow us