Download App

‘राज्यात निजामी अन् रयतेतल्या मराठ्यांचं भांडण’; मराठा आरक्षण वादात आंबेडकरांचा खडा

Prakash Ambedkar News : राज्यात निजामी मराठा आणि रयतेतल्या मराठ्यांचं भांडण, निजामी मराठ्यांनी मतदानासाठी रयतेतल्या मराठ्यांचा वापर केला असल्याचं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. प्रकाश आंबडेकर आज सांगली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान आंबेडकरांनी राज्यातील परिस्थितीवर थेटपणे भाष्य केलं आहे.

‘मी तुझ्याशी कधीही वाद घालणार नाही पण…’, ‘टायगर 3’मधील टॉवेल फाइट सीनवर विकीने सोडले मौन

प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यात आरक्षणासंदर्भात निजामी आणि रयतेतल्या मराठ्यांमध्ये भांडणं सुरु आहेत, सरकार सामंजस्यपणे घेण्यात कमी पडलं आहे. यामध्ये मागणीचा दोष नाही तर सरकारचा दोष आहे. कोणत्याही मागणी संदर्भात सरकार इंतुलेचलती दाखवत नाही हे दुर्दैव असल्याची टीका आंबेडकरांनी केली आहे.

ओबीसी आरक्षणाचे ताट आणि मराठा आरक्षणाचे ताट वेगळे आहे. राज्य शासनाने सामंजस्याने जर घेतले असते प्रामाणिकपणाने चर्चा केली असती तर मार्ग निघू शकला असता. हा खरा लढा मराठा समाजांतर्गत आहे. निजामी मराठा आणि रयतेतला मराठा यांचं हे भांडण आहे. मागील 70 वर्षाची सत्ता यशवंतराव चव्हाणांचा काळ सोडला तर निजामी मराठ्यांच्या हातामध्ये राहिली, दुर्दैवाने निजामी मराठ्यांनी रयतेच्या मराठ्यांना फक्त मतदानासाठी वापरले आणि त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोपही आंबेडकरांनी केला.

ठाकरेंना नडले, राऊतांना भिडले… पण शिंदेंनी सोडले : टीआरपी घोटाळ्यात अर्णब गोस्वामींना दिलासा

निजामी मराठ्यांनी खाजगीकरणाला सुरुवात केली. निजामी मराठा विरुद्ध रयतेचा मराठा असा लढा आहे. रयतेच्या मराठ्यांचे नेतृत्व सध्या मनोज जरांगे-पाटील करत आहेत. धनगर समाजाचे आरक्षण मागे पडले होते ते पुन्हा आले आहे. धनगर विरोधात आदिवासी, कोळी विरुद्ध आदिवासी अशी भांडणे लावली जात असल्याचंही आंबेडकर म्हणाले आहेत.

3 डिसेंबरनंतर राज्यात अन् देशात दंगलीची शक्यता :
साताऱ्याच्या घटनेवरून हॅकिंग किती सोप्पं झालं आहे हे आता स्पष्ट झालंय. मुस्लिम मुलाचा मोबाईल हॅक करून वादग्रस्त अभद्र मजकूर लिहायचा आणि त्यातून दंगली घडवायचा, हा फ्लॅशबॅक लवकरच रिऍलिटीमध्ये येईल. 3 डिसेंबरला पाच राज्यांचा निवडणुकीचा निकाल येईल. त्यानंतर 6 डिसेंबरला अयोध्येत नवीम मोहिम उभारण्यात येईल मग काहीतरी वेगळं उभं राहणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे. गृहविभागाला याबाबत माहिती असल्यामुळे लोकल पोलीस ठाण्याला अलर्ट आला आहे. लोकल पोलीस ठाण्यात अलर्ट आला आहे की नाही हे विचारावे. गुप्तचर विभागाला अलर्ट आला आहे की नाही हे सर्व तपासून पाहावे. राज्यात आणि देशात 3 आणि 6 डिसेंबर नंतर दंगली घडणार असल्याचा दावाही आंबेडकरांनी केला आहे.

Tags

follow us